सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प मालाला

काही किलो किंवा क्विंटल मालाला देऊन उर्वरित माल नियमित भावाने खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांना हा प्रसिद्धीचा फंडा असल्याचे आता पटू लागले आहे. सरासरी दर ८००० ते ८५०० दरम्यान आहे.
Soybeans are getting higher prices for very few goods
Soybeans are getting higher prices for very few goods

अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार, कुठे ११ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याच्या पावत्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. एवढा दर पाहून सोयाबीन उत्पादकांनी आनंद व्यक्त करावा अशी परिस्थिती म्हणता येईल. मात्र हे पूर्णसत्य नसून हे दर केवळ काही किलो किंवा क्विंटल मालाला देऊन उर्वरित माल नियमित भावाने खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांना हा प्रसिद्धीचा फंडा असल्याचे आता पटू लागले आहे. सरासरी दर ८००० ते ८५०० दरम्यान आहे. 

गेल्या आठवड्यात खामगाव बाजार समितीत एका शेतकऱ्याचे सोयाबीन ११ हजार रुपयांवर विक्री झाले. त्याची पावतीच समाज माध्यमात प्रचंड वेगाने फिरत होती. याबाबत माहिती घेतली असता संबंधित शेतकऱ्याने त्यादिवशी जेवढे सोयाबीन विक्रीसाठी नेले त्यातील केवळ एका क्विंटलला हा दर दिल्या गेला. उर्वरित माल दोन ते तीन हजारांच्या फरकाने विक्री झाला. अकोल्यातही सोमवारी (ता. १३) कृषी उत्पन्न बाजार समितीत पातूरच्या शेतकऱ्याचे सोयाबीन ११ हजार ५०१ रुपये दराने विक्री झाले. 

याचीही पावती काही तासात सर्वच व्हॉट्‌सॲप ग्रुपवर धुमाकूळ घालू लागली होती. परंतु हा मुहूर्ताचा दर होता. या शेतकऱ्याने जे सहा-सात कट्टे विक्रीला आणले होते, त्याला व्यापाऱ्याने दर देऊन मुहूर्त केला, असे बाजार समितीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मंगळवारी (ता. १४) अकोल्यात २७ मॉइश्‍चर असलेल्या सोयाबीनची ६१०० रुपयांनी विक्री झाल्याचे समजते. तरीही गेल्या हंगामाच्या तुलनेत सध्याचा दर चांगला असल्याचे शेतकरी, खरेदीदार सांगत आहेत. हे दर किती दिवसांपर्यंत टिकून राहतील याचा अंदाज मात्र कुठलाही व्यापारी, खरेदीदार देत नाही.

सध्या आडेआठ हजार दर सध्या आवकही कमी असल्याने व जुना स्टॉक बहुतांश संपत आल्याने सोयाबीनला चांगला दर मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. ओलावा कमी असलेल्या सोयाबीनला काही बाजार समित्यांमध्ये आठ ते साडेआठ हजारापर्यंत दर मिळत आहे. जे सोयाबीन विक्रीला येत आहे त्यात ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com