राज्यात सोयाबीन ३००० ते ६७५० रुपये क्विंटल

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी ६२०५ ते ६७५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला.२५, २६ व २७ नोव्हेंबरला सोयाबीनचे किमान दर ७ हजाराच्या पुढे गेले होते.
Soybeans cost Rs 3,000 to Rs 6,750 per quintal in the state
Soybeans cost Rs 3,000 to Rs 6,750 per quintal in the state

लातूरमध्ये क्विंटलला ६२०५ ते ६७५० रुपये

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी ६२०५ ते ६७५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला.२५, २६ व २७ नोव्हेंबरला सोयाबीनचे किमान दर ७ हजाराच्या पुढे गेले होते.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान सोयाबीनची एकूण आवक ६७ हजार ५९ क्‍विंटल झाली. २५ नोव्हेंबरला ११ हजार ६१७ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ५६९१ ते ७०३२ रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. २६ नोव्हेंबरला १२ हजार ११७ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ५८९९ ते ७१०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २७ नोव्हेंबरला ८८६३ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ५७४० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटंचा दर मिळाला. 

२९ नोव्हेंबरला १० हजार ४३० क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ५९५१ ते ६७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २९ नोव्हेंबरला १० हजार ४३० क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे  दर ५९५१ ते ६७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३० नोव्हेंबरला ११ हजार ७२९ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला दर ५९६० ते ६४८० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १ डिसेंबरला १२ हजार ३०३ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ५७५० ते ६७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

सोलापुरात क्विंटलला ४००० ते ६१०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात सोयाबीनला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे दरातही सुधारणा झाली. प्रतिक्विंटलला सर्वाधिक ६१०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सोयाबीनची आवक रोज ६० ते ९० क्विंटलपर्यंत  झाली. तर दर प्रतिक्विंटलला किमान ४००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक ६१०० रुपये इतका दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवकेचं प्रमाण काहीसं असंच होतं. रोज ५० ते १०० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान ४२०० रुपये, सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये असा दर मिळाला. प्रतिक्विंटलमागे १०० ते २०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर स्थिर आणि टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

बारामतीत क्विंटलला ५३०० ते ६१५१ रुपये

पुणे ः बारामती बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२) सोयाबीनची सुमारे ५७८ क्विंटल आवक झाली. या वेळी क्विंटलला ५ हजार ३०० ते ६ हजार १५१ रुपये दर मिळाले. 

पुणे जिल्ह्यात बारामती बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक होत असते. इतर बाजार समित्या फळे, भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या बाजार समित्यांमध्ये तुरळक आवक होत असते. तर दौंड तालुक्यातील शेतकरी श्रीगोंदा आणि बारामती बाजार समितीमध्ये  सोयाबीन विक्रीसाठी नेत असतात. पुणे बाजार समितीमध्ये व्यापारी आणि विशेषतः कंपन्यांच्या ब्रॅण्डींगच्या पॅकिंगमध्ये सोयाबीनची आवक होत आहे.

परभणीत क्विंटलला ६१०० ते ६४०० रुपये

परभणी ः परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.१) सोयाबीनची २०५ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ६४०० रुपये, तर सरासरी ६२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील बाजार समितीत परभणी तालुक्यातील गावातून सोयाबीनची आवक होत आहे. मंगळवारी (ता.३०) १८२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५९०० ते कमाल ६२५० रुपये, तर सरासरी ६१५० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.२९) १७२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६४०० रुपये, तर सरासरी ६१०० रुपये दर मिळाले. 

गेल्या आठवड्यात शनिवारी (ता.२७) १७० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ६४०० रुपये तर सरासरी ६२५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.२६) २०८ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ६०५० ते कमाल ६५५० रुपये, तर सरासरी ६३०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२५) ३७६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५१०० ते कमाल ६४०० रुपये, तर सरासरी ६२०० रुपये दर मिळाले.

जळगावात क्विंटलला ५००० ते ६२०० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीनची अत्यल्प आवक होत आहे. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार होत आहेत.  व्यापाऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवला आहे. त्याचे दर ५००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.  या दरांचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना होत नसल्याची स्थिती आहे.

रोज २०० क्विंटल सोबीनचा व्यवहार बाजार समितीमध्ये होत आहे. शेतकऱ्यांकडून आवक होत नसल्याने लिलावदेखील होत नसल्याचे चित्र आहे. दरात गेल्या काही दिवसात पडझड झाली आहे. परंतु दर पुन्हा स्थिरावले आहेत.

लासलगावात क्विंटलला ३००० ते ६२९७ रुपये

नाशिक : येथील बाजार समितीत बुधवारी (ता.१) सोयाबीनची आवक ५४० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ६,२९७ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ६,२३१ रुपये राहिले. मागील महिन्याच्या अखेरच्या सप्ताहाच्या तुलनेत ही आवक पुन्हा कमी झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.३०) आवक १,०४६ क्विंटल झाली. तिला ३,००० ते ६,१९१प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६,०७१ राहिला. सोमवारी (ता.२९) आवक ८३७ क्विंटल झाली. तिला ३,००० ते ६,३७६ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६,२८१ रुपये राहिला.

शुक्रवारी (ता.२७) आवक १,२४९ क्विंटल झाली. तिला ३००० ते ६,५६५ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ६,४६० रुपये राहिला. गुरुवारी (ता.२५) आवक १,०६८ क्विंटल झाली. तिला ३,००० ते ६,६७१ रुपये दर मिळाला. गत नोव्हेंबर महिन्यात बाजार आवारात हळूहळू आवक वाढल्याचे दिसून आले. सुरवातीला दर सहा हजारांच्या खाली होते. मात्र १८ नोव्हेंबर पासून त्यात सुधारणा झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात आवकेचा आढावा घेतल्यास १८,९३३ क्विंटल आवक झाली. त्यास किमान दर ३,००० कमाल दर ६,८२० रुपये राहिले. तर सरासरी दर ५,९२२ रुपये राहिले.

अकोल्यात क्विंटलला ५१०० ते ६५०० रुपये

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या आवकेत थोडी घट दिसून येत आहे. सरासरी तीन ते साडेतीन हजार क्विंटल दरम्यान सोयाबीनची आवक होत आहे. सोयाबीनचे दर काहीसे कमी झाल्याने तसेच पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने आवकेवर थोडा परिणाम दिसून येत आहे. 

बाजार समितीत येणाऱ्या सोयाबीनला ५१०० ते ६५०० दरम्यान दर भेटत आहे. सरासरी ५९०० रुपयांचा भाव सध्या सुरु आहे. ग्रामीण भागात सोयाबीनची यापेक्षा कमी दराने खरेदी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. 

खेडा खरेदीचा माल सध्या साठवून ठेवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असल्यानेही आवकेत फरक दिसू लागला आहे. सोयाबीनचे दर मध्यंतरी वाढले होते. त्यामुळे पुन्हा तेजी आल्यास तो दर मिळवण्याच्या उद्देशाने साठवणुकीचा कल वाढत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com