कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
अॅग्रो विशेष
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत सांगतात सोयाबीनचा ओलावा !
उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यातून वाचलेले सोयाबीन आता बाजारात येत आहे. खेडा तसेच बाजार समितीच्या यार्डावर खरेदी होणाऱ्या या सोयाबीनमधील ओलावा तपासण्याकरिता चक्क मशिनऐवजी तोंडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे आधीच नुकसानीने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची नव्या पध्दतीने लूट होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यातून वाचलेले सोयाबीन आता बाजारात येत आहे. खेडा तसेच बाजार समितीच्या यार्डावर खरेदी होणाऱ्या या सोयाबीनमधील ओलावा तपासण्याकरिता चक्क मशिनऐवजी तोंडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे आधीच नुकसानीने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची नव्या पध्दतीने लूट होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणल्यानंतर व्यापारी तोंडात दाणे धरून, दाताखाली दाबत त्याआधारे ओलावा ठरवून सोयाबीनला दर देतात. या अफलातून पध्दतीच्या आड आधीच पावसामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या लुटीसाठी नवे प्रयत्न होत जात असल्याची चर्चा आहे. पाऊस व दमट वातावरणामुळे सोयाबीनची प्रत यंदा खालावली आहे.
अनेकांचे सोयाबीन काळे पडले तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीनला कोंब आले आहेत. सुरवातीला दिवाळीपूर्वी काढलेले सोयाबीन चांगल्या भावात विकले गेले. त्यानंतर मात्र, पावसाच्या माऱ्यातून वाचलेले सोयाबीन आता व्यापारी म्हणेल त्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सध्या तालुक्यात सोयाबीनचा भाव प्रती क्विंटल २५०० ते ३००० रुपयांपर्यंत आहे. सुरवातीला दाण्यातील ओलावा कमी असल्याने भाव चांगला मिळाला. पण नंतर मात्र दाणांमध्ये ओलावा मोठ्या प्रमाणावर असल्याने सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. व्यापारी सोयाबीन खरेदीपूर्वी त्यातील ओलावा तपासतात. त्याकरिता आर्द्रता तपासणी मशिनचा वापर करणे अपेक्षित राहते. परंतु, खेडा खरेदीसोबतच बाजार यार्डातही सरळ तोंडात सोयाबीनचे दाणे टाकले जातात. हे दाणे दाताखाली धरून दाणाटणक असल्यास त्याप्रमाणात ओलावा गृहित धरून दर दिला जातो. व्यापाऱ्यांच्या या अनोख्या आणि अनाकलनीय पध्दतीमुळे शेतकऱ्यांचीच लूट होण्याची शक्यता अधिक राहते.
मशिनच्या वापराबाबत व्यापाऱ्यांमध्ये उदासीनता
सोयाबीनमध्ये किती प्रमाणात ओलावा असावा, याची माहिती व्यापारी शेतकऱ्यांना देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी तालुक्यात गरजू शेतकऱ्यांची चांगलीच लूट चालविली आहे. विशेष म्हणजे बाजार समितीतही आर्द्रता तपासणी मशिन वापराबाबत व्यापारी उदासीन आहेत. शेतकऱ्यांची लूट होऊ नये याकरिता बाजार समितीने तरी याबाबत गंभीर व्हावे, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर व्यक्त केली जात आहे.
- 1 of 436
- ››