नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दर

नागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम आहे. ६८०० ते ७४०० रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. आवक मात्र कमी झाली असून ती अवघ्या ३०० क्विंटलवर पोचल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
Soybeans in Nagpur Rate of Rs. 7400
Soybeans in Nagpur Rate of Rs. 7400

नागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम आहे. ६८०० ते ७४०० रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. आवक मात्र कमी झाली असून ती अवघ्या ३०० क्विंटलवर पोचल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने सोयाबीनचे दरात तेजी अनुभवली जात आहे. सद्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही. त्यामुळे बाजारातील आवकही घटली आहे. कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात ४५० क्विंटल असलेली आवक या आठवड्यात ३०० क्विंटलवर पोचली. दर मात्र स्थिर आहेत. ६८०० ते ७४०० रुपये असे सोयाबीनचे दर आहेत. अमरावती बाजार समितीत मात्र सोयाबीनचे दर ६६५० ते ७००० रुपये इतके खाली आले आहेत.

नागपूर आणि अमरावती बाजार समितीमधील दरात तब्बल ४०० रुपयांची तफावत अनुभवली जात आहे.  विदर्भातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनचे दर खाली आले आहेत. जास्तीत जास्त सात हजार रुपये दर मिळत आहे. कळमना बाजार समितीत हरभरा आवक २५५३ क्विंटल आहे. दर ४२०० ते ४८७६ रुपये होते. तुरीची आवक १४०३ क्विंटल नोंदविण्यात आली.

बाजारात तुरीचे व्यवहार ६१०० ते ६६५० रुपये दराने झाले. तुरीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४०० रुपयांची घट झाली आहे. केंद्र सरकारने तूर, मूग, उडीद याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम तुरीच्या दरावर झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

मुगाची शनिवारी (ता.२२) ३९ क्विंटलची आवक झाली. त्या आधी किंवा त्यानंतर आवक नसल्याचे सांगण्यात आले. मुगाला ५९०० ते ६१०० रुपये दर मिळाला. बाजारातील ज्वारीची आवक सात क्विंटल होती. दर २२०० ते २५०० रुपयांवर स्थिर होते. गव्हाचे व्यवहार १६५० ते १८१० रुपयाने झाले. गव्हाची आवक १५०० क्विंटल होती. केळीचे दर ४५० ते ५५० रुपये स्थिर आहे. आवक ४५ क्विंटल झाली.

डाळिंबांची आवक ८६० क्विंटल तर दर सात हजार चौदा हजार असे स्थिर आहेत. तोतापल्ली आंबा आवक ४००० क्विंटलची आहे. १४०० ते २१०० रुपये दर होते. गेल्या आठवड्यात आंबा आवक तब्बल दहा हजार क्विंटलवर पोहोचली होती. 

सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये कोरोना

यंत्रणासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.  त्यामुळे आंबा विक्रीचा प्रश्‍न असल्याने कळमना बाजार समितीमधील आवक वाढीस लागली होती, असे सांगण्यात येते. बटाटा दर १२०० ते १३०० होते. आवक १,२२५ क्विंटल राहिली. लाल कांद्याची आवक १२४० क्विंटल, तर दर १३०० ते १५०० रुपये होते. लसूण आवक  घटली. ती गेल्या आठवड्यातील १४०० क्विंटल वरून ५६० क्विंटलवर पोचली. दर ३५०० ते ९००० रुपये होते. 

मोसंबीच्या दरात सुधारणा

बाजारात मोसंबीची नियमित आवक होत आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांचे दर ४००० ते ६००० रुपये असे होते. गेल्या आठवड्यातील मोसंबीची आवक ५६० क्विंटल होती. या आठवड्यात मोसंबीच्या दरात काही सुधारणा अनुभवली. ५००० ते ६००० रुपये दर मिळाला. आवक मात्र कमी होत ७० क्विंटलवर पोचली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com