Agriculture news in marathi, To soybeans in Nanded The rate of six and a half thousand | Page 2 ||| Agrowon

नांदेडमध्ये सोयाबीनला साडेसहा हजारांचा दर

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. परंतु दर मात्र इतर बाजार समितीच्या तुलनेत कमी आहेत. सध्या सोयाबीनला कमाल सहा हजार ७५०, किमान सहा हजार, तर सरासरी सहा हजार ४०० रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली. 

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. परंतु दर मात्र इतर बाजार समितीच्या तुलनेत कमी आहेत. सध्या सोयाबीनला कमाल सहा हजार ७५०, किमान सहा हजार, तर सरासरी सहा हजार ४०० रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली. 

सोयाबीनच्या दरात तेजी असल्याच्या वजनपट्ट्या समाज माध्यमावर फिरत आहेत. यात सोयाबीनला आठ ते साडेआठ हजाराचा दर मिळत असल्याची चर्चा होत आहे. यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीबाबत संभ्रमात आहेत. या बाबत नांदेड बाजार समितीमध्ये येणाऱ्या सोयाबीनबाबत माहिती घेतली. नवा मोंढा बाजारात सध्या सोयाबीनला कमाल सहा हजार ७५०, किमान सहा हजार, तर सरासरी सहा हजार ४०० रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली. 

नांदेड बाजारात १० नोव्हेंबर रोजी सोयाबीनला किमान चार हजार ८९०, कमाल पाच हजार ३००, तर सरासरी ५१०० रुपये दर मिळाला होता. यानंतर दरात सुधारणा होऊन दर सरासरी सहा हजार सहाशेपर्यंत पोचला. हाच दर मागील पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. परंतु अधिकचा दर मिळत असल्याचे वृत्त समाज माध्यमावर फिरत आहे. त्यामुळे शेतकरी बाजारात चौकशी करीत आहेत. परंतु नांदेड जिल्ह्यातील बाजार समिती तसेच खेडा खरेदीत केवळ साडेसहा हजारापर्यंत दर मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी दराची खात्री करून बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणावे, असे आवाहन करण्यात आले.


इतर बातम्या
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...
केसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...
वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...
‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...
कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
आंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...
कनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...
वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई :  राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...
औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड...औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध...
पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार...पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील...
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक...सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात...
परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची १ हजार ७२०...परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास...यवतमाळ : ‘‘रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज...
धान खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलनगडचिरोली : शासकीय आधारभूत केंद्रांवर धान विक्रीची...
टास्क फोर्समुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत...नाशिक: संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने...
खानदेशात पीक कर्ज वितरण अत्यल्प ...जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरण...
जळगावमधील बारा बाजार समित्यांच्या...जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे बारा कृषी...