नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन 

नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे. आतापर्यंत झालेल्या सोयाबीनच्या पेरणीचा विचार करता यंदा सरासरीच्या १८३ टक्के म्हणजे ९९ हजार ४१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन 
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन 

नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे. आतापर्यंत झालेल्या सोयाबीनच्या पेरणीचा विचार करता यंदा सरासरीच्या १८३ टक्के म्हणजे ९९ हजार ४१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे क्षेत्र ७ हजार हेक्टरने वाढले आहे. श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले या पाच तालुक्यांतच ६५ हजारांपेक्षा अधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे. कोपरगावात मात्र क्षेत्र कमी झाले आहे.  नगर जिल्ह्यात यंदा अजूनही पुरेसा पाऊस नाही. मात्र अल्प पावसावरच सोयाबीनच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यानंतर झालेल्या सततच्या पावसाने पिकांनी बहर घेतला आहे. खरिपाच्या पेरण्याने यंदा सरासरी ओलांडली आहे. आता मुग, उडीद, तूर, बाजरी, सोयाबीन पेरणीचा कालावधी संपला आहे. आतापर्यंत झालेल्या पेरणीनुसार यंदा नगर जिल्ह्यांत गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीनचे सरासरी ५४,२९४ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ९९ हजार ४१७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सरासरीच्या तुलनेत ही १८३ टक्के पेरणी झाली आहे. ९२ हजार ४८५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यंदा ७ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले या पाच तालुक्यांत क्षेत्र अधिक आहे. गेल्यावर्षी कोपरगाव तालुक्यात बोगस बियाणेमुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा कोपरगाव तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मात्र घटले आहे.  तालुकानिहाय सोयाबीनचे पेरणी क्षेत्र (कंसात गतवर्षीचे क्षेत्र)  नगर ः ९५२० (९,०००), पारनेर ः १९८६ (३०३०), श्रीगोंदा ः ३९६ (३१४), कर्जत ः ० (२३), जामखेड ः ६५३९ (६२००), शेवगाव ः ११४७ (७४३), पाथर्डी ः ६३२ (३५६), नेवासा ः ५,०३८ (६,१२१), राहुरी ः ७,६७०(३,८१९), संगमनेर ः ११८१० (११,१४७), अकोले ः १०,८५६ (८,०१७), कोपरगाव ः १५९३९ (२१,२५३), श्रीरामपूर ः १२,४०७ (१२,०१०), राहाता ः १५,४७७ (१०,४५२) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com