Agriculture news in marathi Soybeans on one lakh hectares in the town | Page 3 ||| Agrowon

नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे. आतापर्यंत झालेल्या सोयाबीनच्या पेरणीचा विचार करता यंदा सरासरीच्या १८३ टक्के म्हणजे ९९ हजार ४१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे. आतापर्यंत झालेल्या सोयाबीनच्या पेरणीचा विचार करता यंदा सरासरीच्या १८३ टक्के म्हणजे ९९ हजार ४१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे क्षेत्र ७ हजार हेक्टरने वाढले आहे. श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले या पाच तालुक्यांतच ६५ हजारांपेक्षा अधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे. कोपरगावात मात्र क्षेत्र कमी झाले आहे. 

नगर जिल्ह्यात यंदा अजूनही पुरेसा पाऊस नाही. मात्र अल्प पावसावरच सोयाबीनच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यानंतर झालेल्या सततच्या पावसाने पिकांनी बहर घेतला आहे. खरिपाच्या पेरण्याने यंदा सरासरी ओलांडली आहे. आता मुग, उडीद, तूर, बाजरी, सोयाबीन पेरणीचा कालावधी संपला आहे. आतापर्यंत झालेल्या पेरणीनुसार यंदा नगर जिल्ह्यांत गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

सोयाबीनचे सरासरी ५४,२९४ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ९९ हजार ४१७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सरासरीच्या तुलनेत ही १८३ टक्के पेरणी झाली आहे. ९२ हजार ४८५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यंदा ७ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले या पाच तालुक्यांत क्षेत्र अधिक आहे. गेल्यावर्षी कोपरगाव तालुक्यात बोगस बियाणेमुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा कोपरगाव तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मात्र घटले आहे. 

तालुकानिहाय सोयाबीनचे पेरणी क्षेत्र (कंसात गतवर्षीचे क्षेत्र) नगर ः ९५२० (९,०००), पारनेर ः १९८६ (३०३०), श्रीगोंदा ः ३९६ (३१४), कर्जत ः ० (२३), जामखेड ः ६५३९ (६२००), शेवगाव ः ११४७ (७४३), पाथर्डी ः ६३२ (३५६), नेवासा ः ५,०३८ (६,१२१), राहुरी ः ७,६७०(३,८१९), संगमनेर ः ११८१० (११,१४७), अकोले ः १०,८५६ (८,०१७), कोपरगाव ः १५९३९ (२१,२५३), श्रीरामपूर ः १२,४०७ (१२,०१०), राहाता ः १५,४७७ (१०,४५२) 


इतर ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...