Agriculture news in Marathi Soybeans rate hit a high of Rs 6,000 | Agrowon

सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 एप्रिल 2021

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सोयाबीनचे भाव वाढत आहेत. चार हजारांवरून साडे पाच हजारांवर काही दिवसांपूर्वी सोयाबीन गेले होते. पण त्यात आणखी भर पडली आहे.

लातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात सोयाबीनचे भाव वाढत आहेत. चार हजारांवरून साडे पाच हजारांवर काही दिवसांपूर्वी सोयाबीन गेले होते. पण त्यात आणखी भर पडली आहे. सोमवारी (ता. पाच) सोयाबीनला सरासरी सहा हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे. चांगला भाव मिळेल म्हणून घरातच सोयाबीन ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. पहिल्यांदाच सोयाबीन सहा हजारी झाले आहे.

मागील आठवड्यात अकोल्यात सोयाबीन ६१०० रुपयांनी विकले होते. सोमवारी (ता. पाच) या बाजार समितीत पुन्हा २५ रुपयांची क्विंटलमागे वाढ दिसून आहे. ६१२५ रुपयांचा कमाल दर मिळाला. सरासरी दरसुद्धा ६००० मिळाला. तर दुसरीकडे वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत तर यंदाचा सर्वाधिक ६३५० रुपयांचा दर मिळाला. वाशीम बाजार समितीत किमान दर ५७५० पासून सुरू झाला. याठिकाणी दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतही कमीत कमी दर ५७५० एवढाच मिळाला. सरासरी दर ६००० रुपये एवढा होता.  येथे ७९४ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात मोठ्या प्रमाणात दरवर्षी सोयाबीनची आवक असते. पण दरवर्षी चार ते साडेचार हजारांपर्यंतच सोयाबीनला भाव मिळत आहे. पण यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला चार ते साडेचार हजार रुपयापर्यंत भाव राहिला. पण नंतर मात्र भावात वाढ होत गेली आहे.

पाच हजार रुपये काही दिवस भाव राहिला. त्यानंतर पुन्हा त्यात वाढ होत गेली. साडे पाच हजारांवरून ते सहा हजारावर गेले आहे. सोमवारी (ता. ५) सोयाबीनला कमाल सहा हजार १८६ रुपये तर किमान चार हजार ९०१ रुपये प्रतिक्विंटलला भाव राहिला. तर सर्वसाधारण भाव मात्र सहा हजार रुपये प्रतिक्विंटलला राहिला आहे. सध्या पंधरा ते वीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला चांगला भाव मिळेल म्हणून घरात तसेच ठेवले होते त्या शेतकऱ्यांना आता फायदा होत आहे. चार पैसे खिशात पडण्यास मदत होत आहे.

लातूर आडत बाजारात सोमवारी उच्चांकी भाव राहिला आहे. सरासरी सहा हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सहा हजारावर पहिल्यांदाच सोयाबीन गेले आहे. सध्या पंधरा हजार क्विंटलपर्यंत आवक आहे. येथे अनेक प्लान्ट आहेत. त्यांना सोयाबीन लागते. प्लान्ट बंद ठेवून चालत नाही. आवक कमी व मागणी जास्त आहे. त्याचाही भावावर परिणाम दिसून येत आहे.
- ललितभाई शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...