agriculture news in marathi Soybeans rate Rs 3,000 to Rs 4,200 in the state | Agrowon

राज्यात सोयाबीन ३००० ते ४२०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२९) सोयाबीनची सरासरी ३८०० रुपये दराने विक्री झाली. तर, किमान ३३०० व कमाल ४१२५ रुपये दर मिळाला. 

अकोल्यात ३३०० ते ४१२५ रुपये दर

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२९) सोयाबीनची सरासरी ३८०० रुपये दराने विक्री झाली. तर, किमान ३३०० व कमाल ४१२५ रुपये दर मिळाला. 

सध्या या भागात सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात आहे. तर, दुसरीकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीनची आवकही वाढली आहे. दसऱ्यानंतर सोयाबीनच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी पाच हजार पोत्यांपेक्षा अधिक आवक होत आहे.

मागील दोन दिवस सोयाबीनचा सरासरी दर ३९०० रुपये होता. गुरुवारी मात्र १०० रुपयांची त्यात घट आली. सरासरी ३८०० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला. आगामी काळात सोयाबीनची आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली. 

वाशीम जिल्ह्यातील बाजार फुल्ल

सोयाबीनचे आगार म्हटल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. वाशीममध्ये सोयाबीन किमान ३६०० व कमाल ४२४५ रुपये दराने विक्री झाले. ८४७५ पोत्यांची बाजार समितीत आवक झाली होती. एक दिवस आधी याच बाजार समितीत ९४३५ पोत्यांची आवक झाली होती. रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव या बाजार समित्यांमध्येही सोयाबीनची मोठी आवक सुरु आहे.

परभणीत ३७०० ते ४०५० रूपये दर

परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान ३७०० ते कमाल ४२५० रुपये, तर सरासरी ४०५० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांतून या आठवड्यामध्ये यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दरांत तेजी असल्याने दररोज आवकेत वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात दररोज सोयाबीनची १०५० ते २५८० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३७०० ते ४२५० रुपये दर मिळाले, असे सूत्रांनी सांगितले.

सोलापुरात ३००० ते ४२०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सोयाबीनची आवक कमीच राहिली. पण, मागणी असल्याने सोयाबीनला दर चांगला मिळाला. प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ३८०० रुपये आणि सर्वाधिक ४२०० रुपयांपर्यंत दर मिळाला, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सोयाबीनची आवक एक-दोन दिवसांतून एकदा अशी राहिली. ती साधारण प्रतिदिवशी ५०० ते ७०० क्विंटलपर्यंत राहिली. सोयाबीनची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला उठाव मिळतो आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ३८०० रुपये आणि सर्वाधिक ४२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण असेच राहिले. तर, दर किमान ३२०० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ४१२५ रुपये इतका दर मिळाला. त्या आधीही आवक एक-दोन दिवसाआड ४०० ते ५०० क्विंटल अशी राहिली. तर, सोयाबीनचे दर किमान ३००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ४१५० रुपये असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांत १०० ते ३०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर टिकून आहेत.

जालन्यात २८०० ते ४०५० रुपये दर

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २८) सोयाबीनची ६३०४ क्विंटल आवक झाली. त्यास २८०० ते ४०५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान व सरासरी ३७०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला.

जालना बाजार समितीमध्ये २० ऑक्टोबरला ११०४३ क्विंटल आवक झाली. त्यावेळी सोयाबीनचे दर २५०० ते ३९५०, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २१ ऑक्टोबरला ९७१८ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर २००० ते ४००० रुपये व सरासरी ३७५० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

२२ ऑक्टोबर रोजी ९५५३ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनला २२५० ते ४००० रुपये प्रति क्विंटल व सरासरी ३७५० रुपये दर मिळाला. २४ ऑक्‍टोबरला १४५५५ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचा दर २५०० ते ४०००, सरासरी ३७५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. 

सोयाबीनची २६ ऑक्टोबरला ७९५४ क्विंटल आवक झाली. त्यावेळी २७०० ते ४१००, तर सरासरी ३७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २७ ऑक्टोबर रोजी७६२३ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर २३५० ते ४१२५, सरासरी दर ३७०० रुपये प्रति क्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

लासलगावात ३००० ते ४१९१ रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२८) सोयाबीनची आवक २१५९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४१९१ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४०५१ रुपये होते. चालू वर्षी बाजारात आवक वाढली आहे. दरही चांगले मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.२७) सोयाबीनची आवक २८७३ क्विंटल झाली. तिला ३००० ते ४२९० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४१६० रुपये राहिला. सोमवारी (ता.२६) सोयाबीनची आवक १८५६ क्विंटल झाली. तिला ३४०० ते ४४२६, तर सरासरी ४२५१ रुपये दर राहिला.

शनिवारी (ता.२४) सोयाबीनची आवक १९६ क्विंटल झाली. तिला ३०५१ ते ४३०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४०८१ राहिला. शुक्रवारी (ता.२३) सोयाबीनची आवक १७९४ क्विंटल झाली. त्यावेळी ३००० ते ४३२१, तर सरासरी ४१८० रुपये दर राहिला. गुरुवारी (ता.२२) आवक १५४१ क्विंटल झाली. तिला ३००० ते ४४११, सरासरी ४२८१ रुपये दर राहिला.

गेल्या दोन दिवसांत दरांत किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मागील आठवड्यापासून बाजार समितीत सोयाबीनची आवक चांगली होती. मात्र शनिवारी( ता.२४) बाजार समितीत व्यापाऱ्यांचा सहभाग कमी असल्याने आवक कमी झाली.

नांदेडमध्ये ३४०० ते ४०६३ रुपये 

नांदेड : ‘‘नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात सध्या सोयाबीनची आवक वाढली आहे. बुधवारी (ता. २९) बाजारात १२६० क्विंटलची आवक झाली. यावेळी किमान ३ हजार ४०० रुपये, कमाल चार हजार ६३, तर सरासरी तीन हजार ९०० रुपये दर मिळाले’’, अशी माहिती बाजार समितीचे सचिव वामनराव पवार आमदुरेकर यांनी दिली.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात सध्या नवीन सोयाबीनची आवक वाढली आहे. बुधवारी (ता. २९) किमान ३ हजार ४०० रुपये, कमाल ४ हजार ६३ तर, सरासरी ३ हजार ९०० रुपये दर  मिळाले. १९ ऑक्टोबर ते ता. २९ आक्टोबर दरम्यान १५ हजार १०४ क्विंटलची आवक झाली. या दरम्यान सरासरी तीन हजार ९०० रुपये दर मिळाल्याची माहिती आमदुरेकर यांनी दिली.

जळगावात ३२०० ते ३८०० रुपये 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२९) सोयाबीनची ७३ क्विंटल आवक झाली. दर ३२०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जळगाव, पाचोरा, यावल, जामनेर आदी भागातून होत आहे.

आवक कमी झाली आहे. दर्जेदार सोयाबीनचे दर ४००० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. दरात गेल्या आठ ते १० दिवसात सुधारणा झाली आहे. आवक अतिपावसाने यंदाही कमीच आहे. 

आवक, दर (प्रतिक्विंटल, रुपये)

तारीख  आवक  किमान दर  कमाल दर
२९ ऑक्टोबर ७५ ३२०० ३९००
२२ ऑक्टोबर ८१ ३२०० ३८००
१५ ऑक्टोबर ७८ ३२००  ३८००

 

 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
नाशिकमध्ये भेंडी २५०५ रुपये क्विंंटलनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात केळीची खरेदी मंदावलीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची काढणी पूर्ण...
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...