Agriculture news in marathi, Soybeans rate Rs 3,000 to Rs 6,700 per quintal in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

अकोला ः नवीन सोयाबीनची काढणी सुरु झाली आहे. बाजार समित्यांमध्ये आवकही वाढू लागली आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन आवकेत मोठी वाढ दिसून येत आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये

अकोला ः नवीन सोयाबीनची काढणी सुरु झाली आहे. बाजार समित्यांमध्ये आवकही वाढू लागली आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन आवकेत मोठी वाढ दिसून येत आहे. अकोला बाजार समितीत सोयाबीन ४५०० ते ५५०० रुपये दरम्यान विकत आहे. सोयाबीनला सरासरी दर ५१०० दरम्यान मिळत आहे.

या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची काढणी सुरु आहे. त्यातच पावसाचा धुमाकूळ सुरु असल्याने सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची एकच लगबग होत आहे. त्यामुळे काढणी केलेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीला येत आहे. सोयाबीनमध्ये ओलावा अधिक असल्याचे कारण देत कमी भावात खरेदी सुरु आहे.

सध्या सोयाबीनची अकोल्यात १५० पोत्यांपर्यंत आवक आहे. तुलनेने अकोट व इतर बाजार समित्यांमध्ये आवक वाढलेली आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत ५४५० ते ६२५० दरम्यान भाव आहे. सोयाबीनची आवक १६०० पोत्यांपर्यंत होत आहे. पुढील आठवड्यात सोयाबीनच्या आवकेत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

जालन्यात क्विंटलला ४७०० ते ५७०० रुपये

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीनची आवक व दर कमी अधिक राहिले. तर बुधवारी (ता.२२) सोयाबीनची ५२ क्‍विंटल आवक झाली. या सोयाबीनला ४७०० ते ५७०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान, तर सरासरी ५३०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

जालना बाजार समितीमध्ये १६ सप्टेंबरला ३८ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ६८०१ ते ७८०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी ७६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १८ सप्टेंबरला १२३ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ६१०० ते ७९०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी ७००० रुपये दर मिळाला. २० सप्टेंबरला १९० क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ४००० ते ६१५० रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी ५२०० रुपये दर मिळाला. २१ सप्टेंबरला १८३ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ४१०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी दर ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हिंगोलीत प्रतिक्विंटलला ५५०० ते ६४०० रुपये 

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजार (भुसार मार्केटमध्ये) अजून नवीन सोयाबीनची नियमित आवक सुरु झालेली नाही. मंगळवारी (ता.२१) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक होती. त्यास प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ६४०० रुपये, तर सरासरी ५९५० रुपये दर मिळाले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील लवकर येणाऱ्या वाणांच्या नवीन सोयाबीन खरेदी मुहूर्तावर गुरुवारी (ता. ९) प्रतिक्विंटल कमाल ११ हजार २१ रुपये दर दिला होता. मोठ्या क्षेत्रावरील सोयाबीनची काढणी अजून बाकी आहे. त्यामुळे मार्केटमध्ये दररोज नियमित आवक सुरु झालेली नाही.

एक दोन दिवसाआड जुन्या नवीन सोयाबीनची आवक सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरु आहे. गुरुवारी (ता.१६) सोयाबीनची ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६००० ते ७५०० रुपये, तर सरासरी ६७५० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.१८) सोयाबीनची ८० क्विंटल आवक झाली. दर ६००५ ते ७५०५ रुपये, तर सरासरी ६७५५ रुपये मिळाले, असे सूत्रांनी सांगितले.

नांदेडमध्ये प्रतिक्विंटलला ५००० ते ६४०५ रुपये

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवामोंढा बाजारात सध्या नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. २३) ३५० क्विंटल सोयाबीन बाजारात आले. यास कमाल ६४०५, किमान ५००० तर सरासरी ५७०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून नवीन सोयाबीनची आवक बाजारात होत आहे. सध्या जिल्ह्यात पाऊस असल्यामुळे कापणीचे तसेच खळे करण्याचे काम मंदावल्याने आवक घटली आहे. आवक बाजारात नसली तरी दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकरीही बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणत नाहीत. 

गुरुवारी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवामोंढा बाजारात साडेतीनशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली. कमाल ६४०५, किमान पाच हजार, तर सरासरी पाच हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

दरम्यान बाजारात सध्या आवक मंदावली, तरी दरही कमी झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्याच्या इतर भागातही दर कमीच आहेत. या सोबतच मिल स्तरावरही दर ६१०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नगरमध्ये प्रतिक्विंटलला ५००० ते ६७०० रुपये

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची दर दिवसाला २२० ते २५० क्विंटलची आवक होत आहे. प्रतिक्विंटल  ५००० ते ६७०० रुपये व सरासरी ५८५२ रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. 

नगर जिल्ह्यात सोयाबीनचे पीक काढणी सुरू आहे. काही प्रमाणात बाजारात सोयाबीनची आवक होत आहे. नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी सर्वाधिक सोयाबीनची आवक होत असते. सोमवारी २५ क्विंटल आवक होऊन ५००० ते ७५०० रुपये व सरासरी  ७२५० रुपयाचा दर मिळाला.

शनिवारी (ता.१८) ४० क्विंटल आवक होऊन ७००० ते ८००० रुपये व सरासरी ७७५० रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. १५ सप्टेंबर रोजी  ३० क्विंटलची आवक झाली. दर ७५०० ते ८३०० सरासरी ७९०० रुपयाचा मिळाला, अशी कृषी उत्पन्न बाजार समितीतून देण्यात आली.

लासलगावात क्विंटलला ३००० ते ६५०० रुपये 

नाशिक : जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२२) सोयाबीनची आवक ६९८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ६५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ६३११ रुपये होते. सध्या आवक सर्वसाधारण आहे. गत सप्ताहाच्या तुलनेत आवक कमी झाली आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.२१) आवक ८५१ क्विंटल झाली. तिला ३००० ते ६०१६रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ५४०१ रुपये राहिला. सोमवारी (ता.२०) आवक १०६४ क्विंटल झाली. तिला ३००० ते ६६५२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५७०१ रुपये राहिला. 

शुक्रवारी (ता.१७) सोयाबीनची आवक २८८ क्विंटल झाली. तिला ३००० ते ८८८१ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ८००० रुपये राहिला. गुरुवारी (ता. १६) सोयाबीनची आवक १३३ क्विंटल झाली. त्यावेळी ३५०१ ते ८३५२ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५०१ रुपये राहिला. गत सप्ताहात तुलनेत आवक कमी होती. त्यामुळे दरात सुधारणा असल्याचे पाहायला मिळाले; मात्र गेल्या काही दिवसांत आवकेत सुधारणा होत असल्याने दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नागपुरात क्विंटलला ४१०१ ते ५१०० रुपये

नागपूर : केंद्र सरकारने १२ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयातीचा घेतलेला निर्णय त्यासोबतच नव्या हंगामातील सोयाबीनची होणारी आवक, या मुळे बाजारात सोयाबीनचे दर खाली आले आहेत. कळमना बाजार समितीत बुधवारी (ता.२२) सोयाबीनला ४१०१ ते ५१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

केंद्र सरकारने प्रक्रिया उद्योजकांची मागणी लक्षात घेऊन १२ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयातीला परवानगी दिली. दरम्यान, बाजारात नवीन हंगामातील सोयाबीनची आवक होईल, ही बाब दुर्लक्षित करण्यात आली. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २०) कळमना बाजार समितीत सोयाबीन चांगलेच तेजीत होते.

बाजारात सोयाबीनची आवक सोमवारी जेमतेम ३८ क्विंटल होती. त्यानंतर मंगळवारी (ता.२१) सोयाबीनची आवक १४० क्विंटलवर पोचली. या दिवशी मात्र सोयाबीनचे व्यवहार ४२०० ते ६१०० रुपयांपर्यंत खाली आले.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीचे दर पुन्हा...सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये वांगी, घोसाळ्यासह मेथी,...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कोथिंबिरीच्या दरात तेजी कायमनाशिकात क्विंटलला ७००० ते १८१०० रुपये नाशिक :...
नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
औरंगाबादमध्ये कोबी, वांगी, आले दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी...नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरुकोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या...
पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...