सोयाबीन दर दहा हजार झाल्यावरच खरेदीला यावे

शेतकऱ्यांनी मात्र क्विंटलला दहा हजार रुपये दर आला तरच सोयाबीन विक्री करण्याचा निर्धार केला आहे. गावच्या प्रवेशव्दारावर लिहिलेला त्यासंदर्भातील फलक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Soybeans should be purchased only after every ten thousand
Soybeans should be purchased only after every ten thousand

कऱ्हाड, जि. सातारा ः सोयाबीन दरातील घसरणीमुळे अडचणीत आलेले शेतकरी काढणी केलेला सोयाबीन गरजेला तरी विकावा की नको, अशा संभ्रमात आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागातील जांभुळवाडीच्या शेतकऱ्यांनी मात्र क्विंटलला दहा हजार रुपये दर आला तरच सोयाबीन विक्री करण्याचा निर्धार केला आहे. गावच्या प्रवेशव्दारावर लिहिलेला त्यासंदर्भातील फलक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

अलीकडे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदाचा हंगाम चांगला साधेल या आनंदात असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पीक काढणीनंतर सुरू झालेल्या दरातील घसरणीमुळे घोर निराशा झाली आहे. दरातील किंचित वाढ व नंतर होणारी घसरण यामुळे सणांच्या तोंडावर गरजेला तरी सोयाबीन विकावा की नको? या विवंचनेत शेतकरी आहेत. यासंदर्भात सगळीकडेच संभ्रम वाढत असताना कुंभारगावच्या जांभुळवाडीतील शेतकऱ्यांनी मात्र क्विंटलला दहा हजार रुपये दर आला तरच सोयाबीन विक्री करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी गावच्या प्रवेशव्दारावर लिहिलेला त्यासंदर्भातील फलक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ग्रामीण भागात सोयाबीन काढणीनंतर सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी टेम्पो घेऊन गावोगावी फिरतात मात्र जांभुळवाडीकरांनी दहा हजार रुपये दर आल्यावरच व्यापाऱ्यांनी गावात फिरावे, असे सूचना फलकावर लिहिले आहे.

याबाबत स्थानिक प्रगतशील शेतकरी महेश मोरे म्हणाले, ‘‘बहुतांश शेतकरी कोरडवाहू अल्पभूधारक आहेत. सोयाबीनच्या विक्रीवरच त्या कुटुंबाचे अर्थचक्र अवलंबून असते. वाढलेला उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न याचा ताळमेळ बसेनासा झालेला असतानाच सोयाबीनच्या दरातील घसरण काळजी वाढवणारी आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेला उपयोगी येणारे पीक आहे, त्यासाठी कुणावरही सक्ती केलेली नाही, प्रत्येकजण विक्रीबाबत आपल्या मनाने निर्णय घेऊ शकतात, पण बहुतांश शेतकरी दहा हजारांच्या दराशी ठाम आहेत’’.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com