राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२४) सोयाबीनला ३ हजार ते ३ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. गुरूवारी येथे ३० क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
Soybeans in the state cost Rs 2,500 to Rs 3,974
Soybeans in the state cost Rs 2,500 to Rs 3,974

नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२४) सोयाबीनला ३ हजार ते ३ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. गुरूवारी येथे ३० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. 

जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे पीक अधिक प्रमाणात घेतले आहे. मात्र अजून पीक हाती आलेले नाही. शनिवारी (ता. १९) १५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. प्रतीक्विंटलला ३ हजार ५०० ते सरासरी ३ हजार ६५० रुपयांचा दर मिळाला. नेहमीच्या तुलनेत सध्या नगरमध्ये सोयाबीनची आवक कमीच आहे. मात्र, आता खरिपातील सोयाबीन पीक हाती आल्यानंतर आवकेत वाढ होणार असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

परभणीत ३९०० रूपये दर

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ३४४०, सरासरी ३८५०, तर कमाल ३९०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या हंगामातील सोयाबीन काढणी काही भागात सुरु झाली आहे. तरीही अद्याप परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरु झालेली नाही. गतवर्षीच्या सोयाबीनची आवक सुरु आहे.

बुधवारी (ता.२३) सोयाबीनची ४५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला किमान ३३०० ते कमाल ३९०० रुपये, तर सरासरी ३८५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२२) सोयाबीनची ४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३७१० ते कमाल ३९१० रुपये, तर सरासरी ३८०५ रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता.२१) सोयाबीनची ८० क्विंटल आवक झाली. दर किमान ३७५० ते कमाल ३९०० रुपये, दर सरासरी ३८५० रुपये मिळाले. शनिवारी (ता.१९) सोयाबीनची ६० क्विंटल आवक झाली. त्यावेळी किमान ३७०० ते कमाल ३८५० रुपये, तर सरासरी ३८०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.१८) सोयाबीनची ७० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला किमान ३७०० ते कमाल ३८०० रुपये, तर सरासरी ३४४० रुपये दर मिळाले.

जळगावात आवकेची प्रतीक्षा

जळगाव ः जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा व जळगाव येथील बाजारात सोयाबीनची आवक सुरू झालेली नाही. यामुळे दरही जाहीर झालेले नाहीत. अतिपावसाने मळणी रखडली आहे. पीक अनेक भागात हातचे जाण्याची स्थिती आहे. यामुळे सोयाबीनची आवक सुरू झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यातील काही खाद्यतेल निर्मात्या कंपन्यांना जळगाव, अमनेर येथील व्यापारी सोयाबीनचा पुरवठा करीत आहेत. हा खरेदीचा व्यवहार बाजार समितीबाहेर होत आहे. ही आवक मध्य प्रदेशातील इंदूर, राज्यातील लातूर, जालना या भागातील पुरवठादारांकडून होत आहे.

मोठे  पुरवठादार व व्यापारी यांच्यात हे व्यवहार होत आहेत. या व्यवहारात सोयाबीनला ३९०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. शेतकऱ्यांकडून आवक सुरू झाल्यानंतर बाजार समितीमधील व्यवहार सुरू होतील, अशी माहिती मिळाली.

लासलगावात प्रतिक्विंटल २५०० ते ३९७४ रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२३) सोयाबीनची आवक ४२५ क्विंटल झाली. त्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३९७४ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३९०१ रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.२२) सोयाबीनची आवक ४५५ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ३८७६ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७७६ होता. सोमवारी (ता.२१) आवक ४४४ क्विंटल झाली. त्यावेळी ३००० ते ३९५१, तर सर्वसाधारण दर ३८५१ रूपये होता. शुक्रवारी (ता.१८) सोयाबीनची आवक ६३० क्विंटल झाली. तिला १९५१ ते ३९३३ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३८४० होता.

बुधवारी (ता.१६) सोयाबीनची आवक ४८५ क्विंटल झाली. तिला २५०० ते ३८७४ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत सोयाबीनची आवक चांगली होती. चालू आठवड्यात आवक मंदावली आहे. त्यानुसार दर सर्वसाधारण आहेत. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी, जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ-उतार दिसून आला.

गुरुवारी (ता.१७), शनिवारी (ता.१९) व रविवारी (ता.२०) बाजार समितीचे कामकाज बंद होते. त्यामुळे सोयाबीनचे व्यवहार झाले नाहीत.

नांदेडमध्ये ३६०० ते ३७६० रुपये दर

नांदेड  : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात सध्या नवीन सोयाबीन आलेले नाही. जून्या सोयाबीनची आवक मात्र सुरु आहे. मागील सहा दिवसांत एक हजार १८५ क्विंटलची आवक झाली. यास सरासरी ३ हजार ६०० ते ३ हजार ७६० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीचे सचिव वामनराव पवार यांनी दिली.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात सध्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाच्या आवकेत घट झाली आहे. यामुळे नवीन सोयाबीन बाजारात आलेले नाही. शेतकरी दर वाढतील या आशेने घरात साठवलेले सोयाबीन नवे सोयाबीन येण्यापूर्वी बाजारात आणत आहेत.

कळमनामध्ये ३८०० रुपये दर

नागपूर : शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड आणि सोयाबीन तेलाच्या दरात स्थिरता आल्यास सोयाबीनचे दर ४२०० पर्यंत जाण्याचा अंदाज व्यापारी स्तरावर व्यक्त केला जात आहे.

सध्या दर घसरून ३८०० रुपयांवर आले आहेत. सोयाबीन तेल दरात सातत्याने चढउतार होत आहेत. त्यामुळे काही व्यापारी दरांच्या स्थिरतेबाबत साशंकता देखील व्यक्त करत आहेत.  

कळमना बाजार समितीत गेल्यावर्षी सोयाबीनचे  व्यवहार ३१०० ते ३३४० रुपयाने झाले.  त्यात मध्यंतरीच्या काळात वाढ होत ३४०० ते ३७०० रुपयांचा दर एप्रिल २०१९ मध्ये मिळाला. मे २०१९ मध्ये ३९०० ते ४३६६ असा दर राहिला. यावर्षी २०२० मध्ये सोयाबीन दर सुरुवातीला तेजीत होते. ४००० ते ४३०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले.

 दरातील ही तेजी जानेवारी २०२० महिन्यात कायम होती. त्यानंतर दरात घसरण झाली.  पुन्हा फेब्रुवारी २०२० महिन्यात दर तेजीत आले.  त्यानंतर दर पुन्हा घसरून ३८०० रुपयांवर आले आहेत. सोयाबीन व्यवहारात फ्युचर ट्रेडिंग होणाऱ्या शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड  आणि आणि सोयाबीन तेलाचे दर स्थिर राहिल्यास येत्या काळात सोयाबीन ४२०० रुपये पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मात्र यात चढ-उतार झाल्यास ३८५० ते ३९५० असा दर राहण्याचा अंदाज आहे.

जालन्यात ३१०० ते ३७५० रुपये दर

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२४) सोयाबीनची जवळपास १०२ क्विंटल आवक झाली. त्यास ३१०० ते ३७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

मागील पंधरवड्यात सोयाबीनच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. ११ सप्टेंबर रोजी १३५ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ३२०० ते ३५५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ सप्टेंबर रोजी १८९ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ३२०० ते ३५६० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १४ सप्टेंबर रोजी १९९ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ३२०० ते ३६२५ रुपये प्रति क्‍विंटल राहिले.

१६ सप्टेंबर रोजी १४२ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनला २९११ ते ३६५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. १९ सप्टेंबर रोजी ३१३ क्विंटल आवक झाली. त्यावेळी दर ३१०० ते ३७२५ रुपये प्रति क्विंटल राहिले. २१ सप्टेंबर रोजी ३३७ क्विंटल आवक झाली. दर ३२०० ते ३७७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. २२ सप्टेंबर रोजी १०६ क्विंटल आवक झाली. दर ३१०० ते ३७२५ रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

सोलापुरात पावसामुळे आवकेची प्रतीक्षा

सोलापूर ः सोयाबीनच्या काढणी हंगामात पावसाने ऐनवेळी हजेरी लावून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये अद्यापही सोयाबीनची आवक होऊ शकलेली नाही. आणखी पंधरवड्याने सोयाबीनची आवक बाजारात होईल, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यात यंदा सोयाबीनची पेरणी चांगली आहे. विशेषतः बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूरात त्याचे क्षेत्र आहे. सध्या या भागात सोयाबीनची काढणी सुरु आहे. काहींनी काढून ठेवले आहे. पण, ऐन काढणीच्या हंगामातच गतसप्ताहात सलग तीन दिवस पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले.

या आठवड्यात बाजारात येऊ शकणारे सोयाबीन अद्यापही आलेले नाही. शासनाकडून सोयाबीनचा खरेदीदर ३८८० रूपये जाहीर झाला आहे. पण, खरेदी केंद्रेही अद्याप सुरु नाहीत. त्याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तरीही, जिल्ह्यात किमान ७५ टक्के क्षेत्रावरील सोयाबीनचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे फक्त २५ ते ३० टक्केच सोयाबीन बाजारात येण्याची शक्‍यता आहे.

अकोल्यात सरासरी ३८०० रुपये

अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२४) सोयाबीनची सरासरी ३८०० रुपये दराने खरेदी झाली. तसेच ६४२ क्विंटल आवक बाजार समितीत झाल्याची माहिती मिळाली.

सोयाबीनचा यंदाचा हंगाम सुरु झाला आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे काढणीच्या कामात खोडा घातला गेला. मात्र, आता पाऊस उघडताच पुन्हा हे काम वेगाने सुरु होणार आहे. बाजार समितीत जुनी तसेच काही अंशी नवीन सोयाबीन येत आहे. 

गुरुवारी (ता.२४) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झालेल्या सोयाबीनला किमान ३३८० आणि कमाल ३८१० रुपये एवढा दर होता. सरासरी ३८०० रुपये क्विंटलने खरेदी झाली. सोयाबीनचे दर यंदा हंगामाच्या तोंडावर बऱ्यापैकी मिळू लागले आहेत. ही तेजी आणखी काही दिवस टिकल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा  होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com