तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन पाण्याखाली

कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन पाण्याखाली गेले आहे.
Soybeans submerged due to heavy rains in Tadwale
Soybeans submerged due to heavy rains in Tadwale

कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन पाण्याखाली गेले आहे.

चार दिवसांपासून कसबे तडवळेसह दुधगाव, खामगाव, कोंबडवाडी, गोपाळवाडी रुई, तुगाव,कौडगाव, हळदगाव, वाघोली सातेफाळ, सौंदणा या शिवारात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.गुरुवारी (ता.२४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या शिवारात जोरदार पावसाला सुरवात झाली. तब्बल दीड तास मोठा पाऊस पडला. या पावसामुळे शिवारातील लहान-मोठे ओढे, नदी, नाले भरून तुडुंब वाहिले. तर शेतात सर्वत्र पाणी साचले. तुगाव शिवारामध्ये तर पावसाने कहर केला. या शिवारात अतिवृष्टी झाली. नदी नाले तुडुंब भरून वाहिले आहेत. 

पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाबाबतचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सोयाबीनचे घसरलेले दर व यामध्ये पावसाने पिकाची नासाडी होऊ लागल्याने फार मोठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com