agriculture news in marathi, Soybeen sowing in Khandesh reduced by 2 thousand hectare | Agrowon

खानदेशात सोयाबीनची पेरणी २ हजार हेक्टरने घटली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018
जळगाव : खानदेशात यंदा सोयाबीनची पेरणी घटली आहे. परिणामी उत्पादनावरही परिणाम होईल, अशी स्थिती आहे. पेरणी वाढण्याचा अंदाज फोल ठरला आहे.
 
जळगाव : खानदेशात यंदा सोयाबीनची पेरणी घटली आहे. परिणामी उत्पादनावरही परिणाम होईल, अशी स्थिती आहे. पेरणी वाढण्याचा अंदाज फोल ठरला आहे.
 
सोयाबीनची पेरणी चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, शिरपूर, शहादा या भागात अधिक केली जाते. खानदेशात एकूण ४० हजार हेक्‍टरवर अपेक्षित असलेली ही पेरणी यंदा सुमारे ३८ हजार हेक्‍टरवर झाली आहे. सुरवातीला पेरणी चांगली झाली होती. परंतु जूनमध्ये पावसाने काही दिवस ओढ दिल्याने सोयाबीनचे अंकुरण व्यवस्थित झाले नाही. यामुळे पीक मोडण्याची वेळ आली. चोपडा, यावल भागात ही समस्या अधिक होती. त्यांनतर सोयाबीनची पेरणी फार झाली नाही. त्याऐवजी कडधान्य व ज्वारीची पेरणी शेतकऱ्यांनी केली.
 
यंदा खानदेशात सुमारे ५० हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी अपेक्षित होती. कारण कापूस पिकात बोंड अळीने फटका बसला. परिणामी कापसाऐवजी सोयाबीनची पेरणी होईल, असे संकेत होते. सोयाबीनचे दरही स्थिर होते. सुरवातीला चांगली पेरणी झाली, परंतु नंतर सोयाबीन मोडावे लागल्याने क्षेत्र कमी झाल्याची माहिती आहे. महाबीजने जळगाव जिल्ह्यासाठी १२ हजार हेक्‍टरवर सोयाबीन बिजोत्पादनाची तयारी केली होती. परंतु सुरवातीला पेरणीलायक पाऊस आला नाही.  जळगाव जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात सुमारे एक हजार हेक्‍टरने घट झाल्याची माहिती आहे.
 
सोयाबीनचे पेरणी क्षेत्र कमी असले तरी काही भागातील पीक मात्र जोमात आहे. पिकातील तूट काही ठिकाणी किरकोळही नाही. त्यामुळे उत्पादनात फारशी घट येणार नाही, असाही अंदाज आहे..

इतर ताज्या घडामोडी
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर...जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा...
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग...परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेचजळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले...