बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्जपुरवठ्यासाठी विशेष मोहीम

बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्जपुरवठ्यासाठी विशेष मोहीम
बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्जपुरवठ्यासाठी विशेष मोहीम

बुलडाणा : जिल्ह्यामध्ये तीन लाख ६० हजार शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी  जवळपास तीन लाख एक हजार शेतकऱ्यांना पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अद्यापही जवळपास ५९ हजार शेतकऱ्यांनी पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही. अशा शेतकऱ्यांना पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत केंद्र शासनाकडून निर्देश देण्यात आले असून जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांना सुटसुटीतरीत्या अर्ज करण्याकरिता आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांमध्ये बॅंकांमार्फत पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पातळीवर विशेष मोहिमेदरम्यान आपल्या कार्यक्षेत्रातील बॅंकांना सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही बँकेकडून पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड  घेतलेले नाही, अशा  शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com