Agriculture news in marathi, Special campaign of 'Farmer's Mandhan 'launched in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात ‘शेतकरी मानधन’ची विशेष मोहीम सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

नांदेड :‘‘जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भू- धारक शेतकरी कुटुंबीयांना वृध्दापकाळात प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत मिळावी, यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अमंलबजावणीसाठी शुक्रवार (ता. २३) ते रविवार (ता. २५) या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले.

नांदेड :‘‘जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भू- धारक शेतकरी कुटुंबीयांना वृध्दापकाळात प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत मिळावी, यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अमंलबजावणीसाठी शुक्रवार (ता. २३) ते रविवार (ता. २५) या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले.

केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. रविवारपर्यंत योजनेची नोंदणी, तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या सहभागातून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

१८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पेक्षा कमी जमीन धारणा असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. आपले सरकार सेवा केंद्रावर एक साधा अर्ज, बँक पासबुक, आधार ओळखपत्र, नमुना ८ अ चा उतारा सादर केल्यानंतर नोंदणी पूर्ण होणार आहे. या वेळी कोणतीही रोख रक्कम लगेच भरण्याची आवश्यकता नाही. योजनेसाठी लाभार्थ्याचे अंशदान त्याच्या खात्यातून आपोआप जमा करण्यात येईल. तेवढे अंशदान केंद्र सरकारकडून विमा महामंडळाकडे जमा करण्यात येईल.

वयाची ६० वेर्ष पूर्ण होताच लाभार्थ्यांना प्रतिमहिना ३ हजार रुपये मानधन मिळण्यास सुरवात होईल. एकाच कुटुंबातील अनेकजण या योजनेत सहभागी होऊ शकतात. तथापी त्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्रपणे अंशदान भरावे लागेल. ते भरता आले नाही तरी जमा रक्कम व्याजासह मिळण्याची सोय या योजनेत आहे. ही योजना प्राधान्याने अल्प व अत्यल्प जमीनधारकांसाठी आहे. 

उच्च आर्थिक उत्पन्न असलेले शेतकरी, जमीनधारण करणारी संस्था, संवैधानिक पदधारण करणारी अथवा केलेली व्यक्ती, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे निवृत्त अधिकारी-कर्मचारी, आयकर भरणाऱ्या व्यक्ती, डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुविशारद इत्यादींना या योजनेसाठी अपात्र ठरवले आहे. मात्र शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशीही माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...