किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विशेष अभियान ः जिल्हाधिकारी ठाकरे

किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विशेष अभियान ः जिल्हाधिकारी ठाकरे
किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विशेष अभियान ः जिल्हाधिकारी ठाकरे

नागपूर : पीककर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिविषयक सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी ८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा उपनिबंधक अनिल कडू, नाबार्डच्या जिल्हा व्यवस्थापक मैथिली कोवे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक विजयसिंह बैस या वेळी उपस्थित होते. पीककर्ज मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रेच किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी लागणार आहेत. या कार्डची वैधता पाच वर्षे राहणार असून १ लाखापर्यंत शून्य व्याजदर असणार आहे. तर ३ लाखांपर्यंतच्या रक्कमेवर १ टक्का व्याज आकारण्यात येईल. शेतकऱ्यांना सहज कर्जपुरवठा उपलब्ध होण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.  जिल्ह्यामध्ये १ लाख ५५ हजार ८५० शेतकरी पी. एम. किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असून, वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बॅंकांकडून या पैकी १ लाख ४ हजार ३१८ लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात आला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था अथवा बॅंकेकडून पीककर्ज न घेतलेले ५१ हजार ५३२ पी.एम. योजनेचे लाभार्थी शेतकरी जिल्ह्यामध्ये शिल्लक आहेत. या शेतकऱ्यांना बॅंकिंग क्षेत्राकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत केंद्र शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना सुटसुटीत रीत्या अर्ज करता यावा यासाठी आय.बी.ए. संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बॅंकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या बॅंकेमधून पी.एम. किसान योजनेचा लाभ घेतला आहे, तेथे संपर्क साधावा. परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह प्राप्त झालेल्यापासून १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बॅंकामार्फत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेअंतर्गत पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या पी. एम. किसान लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था अथवा बॅंकेकडून पीककर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात ४९ हजार ८३० शेतकरी पात्र असून, ४८ हजार ३३८ शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. ४७४ शेतकऱ्यांचे आधार बॅंक खात्याशी लिंक नसल्याचे निदर्शनास आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com