साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात विशेष समिती : मुख्यमंत्री

मुंबई : साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यांसंदर्भात बुधवारी (ता.२२) विधानमंडळात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
मुंबई : साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यांसंदर्भात बुधवारी (ता.२२) विधानमंडळात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

मुंबई : राज्यातील साखर उद्योगांच्या समस्यांसंदर्भात उपाय योजण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शक्तीप्रदत्त समितीची स्थापना करण्याचे, तसेच केंद्राकडे असलेल्या विविध विषयांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे नुकतेच दिले. साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात विधानमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२१) बैठक झाली. साखरेचे दर, अतिरिक्त उत्पादनामुळे होणारी अडचण, एफआरपीचा दर, ऊस क्षेत्रात झालेली वाढ आदी विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘साखर कारखानदारांच्या व उद्योगांच्या समस्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर संघ, खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसह विविध विभागाचे सचिव यांचा समावेश आहे. ही समिती तातडीने कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात उपाय सुचविणार आहे.’’ राज्यात अतिरिक्त साखर उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेऊन साखर निर्यात करण्याची परवानगी द्यावी व त्यासंदर्भात प्रत्येक कारखान्याला निर्यातीचा कोटा ठरवून देण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाशी निगडित विषयासंदर्भात प्रधानमंत्री यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. श्री. वळसे पाटील यांनी साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात माहिती दिली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, मधुकरराव चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री राजेश टोपे, हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com