Agriculture news in Marathi, Special meeting for establishment of farmers' manufacturing companies | Agrowon

शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेबाबत विशेष बैठक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

नाशिक : जागतिक द्राक्ष उत्पादनात नाशिकचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम द्राक्ष तयार होतात. याकामी पॅकहाउस, शीतगृहे, वाहतूक,   पॅकिंग साहित्य व रोजगार यामुळे जिल्ह्यात मोठ्या संधी निर्माण झाल्या. त्यात अनेक द्राक्ष उत्पादक व संबंधित घटक समृद्ध झाले आहे. मात्र, सद्यःस्थितीत अनियंत्रित व असंघटित व्यापारामुळे द्राक्ष उत्पादकांचे अर्थकारण विस्कळित झाले आहे. यासाठी सकारात्मक विचार करून पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक : जागतिक द्राक्ष उत्पादनात नाशिकचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम द्राक्ष तयार होतात. याकामी पॅकहाउस, शीतगृहे, वाहतूक,   पॅकिंग साहित्य व रोजगार यामुळे जिल्ह्यात मोठ्या संधी निर्माण झाल्या. त्यात अनेक द्राक्ष उत्पादक व संबंधित घटक समृद्ध झाले आहे. मात्र, सद्यःस्थितीत अनियंत्रित व असंघटित व्यापारामुळे द्राक्ष उत्पादकांचे अर्थकारण विस्कळित झाले आहे. यासाठी सकारात्मक विचार करून पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत सक्षम द्राक्ष विक्री व्यवस्था उभी करणे, नवीन पेटंट द्राक्ष वाणांच्या संदर्भात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापना या विषयावर चर्चा केली जाणार असून, या विशेष बैठकीचे आयोजन मंगळवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता द्राक्ष बागायतदार संघ कार्यालय, ओझर मिग येथे करण्यात आले आहे. 

द्राक्ष शेती किफायतशीर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, दाभोळकर प्रयोग परिवार, सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी तसेच विविध शेतकरी गट कार्यरत आहेत. मात्र सर्वांचे एकत्रित संघटन व विक्री व्यवस्था नसल्याने द्राक्षाची मार्केटिंग, विक्री व्यवस्था याकरिता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा फायदा अनेक व्यापारी व संबंधित घटक घेतात. यामुळे शेतकऱ्याला योग्य मोबदला न मिळता त्याचे नुकसान होते. 

यामुळे आगामी काळात द्राक्षाचे मार्केटिंग, विमा, व्यापार व इतर बाबी तसेच तांत्रिक अडचणींवर मात करणे काळाची गरज असल्याने या बैठकीत याबद्दल चर्चा करून मते विचारात घेतली जाणार आहेत. पुढील काळात सामाईक उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी संस्था स्थापन करणे. या माध्यमातून बाजारपेठेवर नियंत्रण मिळवून उत्पादन खर्चाच्या आधारित दर मिळविण्यासह द्राक्ष निर्यातीसंबंधीचे व्यवहार नोंदणीकृत निर्यातदारामार्फत व्हावेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाचा विश्वासार्ह ब्रँड तयार करण्याचा या मागील उद्देश आहे.

काळाची पावले ओळखून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन व द्राक्ष पिकाची मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्याच्या हेतूने कृती आराखडा तयार करण्यासाठी उत्सुक व उपक्रमशील शेतकऱ्यांनी बैठकीला स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक जिल्हा कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग यांनी केले आहे.


इतर बातम्या
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ....सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...