Agriculture news in marathi Special package for Sangli, Kolhapur: Dr. vishwajeet Kadam | Agrowon

सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ. विश्‍वजित कदम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. सरकारकडून मदत मिळाली. मात्र, अद्यापही शेती, रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. महापूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाणार आहे’’, अशी माहिती कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री डॉ. कदम यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे महापुराने प्रचंड नुकसान झाले. त्या काळातील मदत तोकडी आहे. 

सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. सरकारकडून मदत मिळाली. मात्र, अद्यापही शेती, रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. महापूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाणार आहे’’, अशी माहिती कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री डॉ. कदम यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे महापुराने प्रचंड नुकसान झाले. त्या काळातील मदत तोकडी आहे. 

डॉ. कदम म्हणाले, ‘‘शेती, घरं आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. अद्यापही मदतीची गरज आहे. महापुराच्या कालावधीत ब्रम्हनाळ घटना घडली होती. अनेकांना प्राण गमवावा लागला. भविष्यात पूरस्थितीचा सामना करावा लागणार नाही, याबाबतची दक्षता घेतली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उपाययोजनांबाबत अहवाल तयार केला असून तो शासनाला सादर केला आहे.’’ 

‘‘मॉन्सूनचे चक्र बदलले आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तयारी करावी लागेल. तत्कालीन सरकारने पाच वर्षात अनावश्‍यक योजनांसाठी खर्च केला. महाविकास आघाडीपुढे अनेक अडचणी आहेत. मात्र तीन पक्षांचे असलेले महाविकास आघाडीचे सरकार लोकांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहील.'' 

‘एफआरपी'साठी २८ जानेवारीला बैठक 

राज्यातील साखर कारखाने सुरु होवून दोन महिने झाले. उसाच्या एफआरपीचा प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत डॉ. कदम म्हणाले,"महापूर, दुष्काळामुळे ऊसाचे उत्पादन घटले. उताराही कमी झाला. कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने एफआरपीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत २८ रोजी मुंबईत बैठक होत आहे.

डॉ. कदम म्हणाले... 

  •  सहकार विभागाला गतवैभव देऊ 
  •  सहकाराचा अभ्यास सुरु 
  •  जलयुक्त शिवारची होणार पडताळणी 
  •  ब्रम्हनाळ महापूर घटनेची चौकशी सुरुच 

इतर बातम्या
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...