नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके नरभक्षक बिबट्याच्या मागावर
औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर बिबट्याच्या शोधासाठीची मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर बिबट्याच्या शोधासाठीची मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका परिसरात जवळपास सहा विविध जिल्ह्यातील विशेष पथके बिबट्याचा माग घेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव स्थित पथकही बिबट्याच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहे, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला पकडण्याचे आदेश नागपूरच्या मुख्यालयातून वन विभागाच्या पथकांना प्राप्त झाले आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एकामागून एक बिबट्याने हल्ला केल्याच्या, त्यामध्ये काही जण जखमी, तर काही जण मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाची पथके जंग जंग पछाडत आहेत.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अमरावती, औरंगाबाद, पुणे, नांदेड, बुलडाणा आदी जिल्ह्यातील वन विभागाच्या विशेष पथकांना पाचारण करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यात बिबट्याच्या पायाचे ठसे मिळाले असले तरी त्याचा ठोस माग मिळेल, असे काही अजून हाती आलेले नाही. त्यामुळे संबंधित गावांमधील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पथके परिसरातील नदीच्या दुतर्फा बिबट्याचा माग घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात आपेगाव स्थित कार्यरत पथक बिबट्याचा शोध घेत आहे. आपेगावच्या घटनेनंतर केकत जळगाव येथे आढळलेला पायाचा ठसा, काही ठिकाणी ओरखडे वगळता कुठे पाळीव प्राणी किंवा कुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली नसल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
नमुने तपासणीसाठी ‘सीसीएमबी’कडे
बिबट्याने हल्ला केलेल्या घटनेतील सापडलेले नमुने तपासणीसाठी हैदराबाद स्थित सीसीएमबी लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. अशाच प्रकारची प्रक्रिया बीड जिल्ह्यातील घटनांच्या बाबतीतही केली जाणार आहे. दोन्ही भागातील नरभक्षक बिबट्या एक की वेगवेगळे, याचा शोध यामधून घेणे शक्य होईल, असे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.