agriculture news in marathi, Speed ​​of redevelopment of Pune market committee | Agrowon

पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गती
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. सुमारे ७०० कोटींचा हा प्रकल्प बाजार समिती आणि आडतदार यांच्यातील विसंवादामुळे रखडला होता. मात्र, आता अडते असोसिएशनने काही अटींवर मान्यता दिल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे. मूळ आराखड्यामध्ये अडतदारांच्या सूचनांनुसार काही दुरुस्त्या करण्यात येणार आहे. यानंतर या आराखड्याचे मुख्यमंत्र्यांना सादरीकरण करून अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी (ता. १९) बाजार समिती प्रशासन, वास्तुविशारद आणि अडतदारांमध्ये बैठक होणार आहे.

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. सुमारे ७०० कोटींचा हा प्रकल्प बाजार समिती आणि आडतदार यांच्यातील विसंवादामुळे रखडला होता. मात्र, आता अडते असोसिएशनने काही अटींवर मान्यता दिल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे. मूळ आराखड्यामध्ये अडतदारांच्या सूचनांनुसार काही दुरुस्त्या करण्यात येणार आहे. यानंतर या आराखड्याचे मुख्यमंत्र्यांना सादरीकरण करून अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी (ता. १९) बाजार समिती प्रशासन, वास्तुविशारद आणि अडतदारांमध्ये बैठक होणार आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुलटेकडी येथील आवार आता शहरात आले आहे. वाढलेला व्यापार, वाहतूक कोंडी, इमारतींची दुरवस्था यामुळे या बाजार आवाराचा पुनर्विकास व्हावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी प्रयत्न केले. यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती केली. वास्तुविशारदांनी अत्याधुनिक बाजाराचा आराखडा बाजार समितीला सादर केला. या वेळी बाजार विस्थापित होऊन नुकसान होईल, वेळेत बांधकाम पूर्ण न झाल्यास नुकसानीला सामोरे जावे लागेल, बांधकामाची रक्कम अडतदारांकडून घेण्यास अडतदारांचा विरोध आदी विविध कारणांनी झालेल्या विरोधामुळे पुनर्विकास प्रकल्प रेंगाळला होता. 
मात्र, या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रशासक बी. जे. देशमुख यांनी गती दिली असून, अडतदार संघटना, विविध अडते यांच्याशी चर्चा करून, मूळ आराखड्यात बदल करण्यास मान्यता दिली.

आराखडा अंतिम करण्यासाठी बुधवारी (ता. १९) वास्तुविशारद, अडतदारांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत अडत्यांच्या सूचना आणि मागणीनुसार आराखड्यात बदल करण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. हा आराखडा अंतिम झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यानंतर राज्य शासनाच्या मान्यतेनंतर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 

आंतरराष्ट्रीय वास्तुविशारदाची होणार नियुक्ती 

पुरंदर येथील आंतरराष्‍ट्रीय विमानतळालगत दिवे येथे सुमारे ४०० एकरांवर राष्ट्रीय बाजार उभारण्यात येणार आहे. यासाठीच्या जागेची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अहवाल तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर होणार आहे. यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शनानंतर जागा खरेदी किंवा भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. या बाजार उभारणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजार उभारणीचा अनुभव असलेल्या वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...