नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा काढणीस वेग
तांदलवाडी, जि. जळगाव : सध्या गहू व हरभरा काढणीला वेग आला आहे.
तांदलवाडी, जि. जळगाव : सध्या गहू व हरभरा काढणीला वेग आला आहे. यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याने, भूगर्भातील पातळीतही चांगलीच वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमाने वाढली आहेत. रब्बी हंगामात या वर्षी दर वर्षीच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या वर्षी पडलेली कमी-अधिक थंडी रब्बी हंगामाला पोषक असल्याने पिकांची वाढ बऱ्यापैकी दिसून आली. रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिसरात सध्या गहू, हरभऱ्याचे पीक चांगले बहरले होते. गेल्या वर्षी गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला जास्त भाव होता. त्यामुळे गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला कमी पाणी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी जास्त प्रमाणात केली आहे. पुन्हा आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे मजूर काही अंशी धास्तावलेला बघावयास मिळत आहे.
या वर्षी चांगले पीक येऊनही शेतकऱ्यांना कोरोनामुळे चांगलाच झटका दिला आहे. संकटांची मालिका सुरूच असली तरीही बळिराजा जोमाने कामाला लागला आहे.
मजुरांची अडचण
सगळीकडे शेतीची कामे सुरू असल्याने मजूरही कमी प्रमाणात मिळत आहे. सध्या मजूर शेतीकामे उधड्या भावाने मागत आहेत व घेतलेली उधडी कामे लवकरात लवकर आटोपती घेत आहेत. तरीही या सर्व परिस्थितीवर मात करत बळिराजा पुन्हा जोमाने कामाला लागला.
- 1 of 1096
- ››