agriculture news in marathi speed ​​of wheat, gram harvesting in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा काढणीस वेग

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

तांदलवाडी, जि. जळगाव :  सध्या गहू व हरभरा काढणीला वेग आला आहे.

तांदलवाडी, जि. जळगाव :  सध्या गहू व हरभरा काढणीला वेग आला आहे. यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याने, भूगर्भातील पातळीतही चांगलीच वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमाने वाढली आहेत. रब्बी हंगामात या वर्षी दर वर्षीच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

या वर्षी पडलेली कमी-अधिक थंडी रब्बी हंगामाला पोषक असल्याने पिकांची वाढ बऱ्यापैकी दिसून आली. रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिसरात सध्या गहू, हरभऱ्याचे पीक चांगले बहरले होते. गेल्या वर्षी गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला जास्त भाव होता. त्यामुळे गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला कमी पाणी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी जास्त प्रमाणात केली आहे. पुन्हा आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे मजूर काही अंशी धास्तावलेला बघावयास मिळत आहे. 

या वर्षी चांगले पीक येऊनही शेतकऱ्यांना कोरोनामुळे चांगलाच झटका दिला आहे. संकटांची मालिका सुरूच असली तरीही बळिराजा जोमाने कामाला लागला आहे.

मजुरांची अडचण

सगळीकडे शेतीची कामे सुरू असल्याने मजूरही कमी प्रमाणात मिळत आहे. सध्या मजूर शेतीकामे उधड्या भावाने मागत आहेत व घेतलेली उधडी कामे लवकरात लवकर आटोपती घेत आहेत. तरीही या सर्व परिस्थितीवर मात करत बळिराजा पुन्हा जोमाने कामाला लागला.


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...