नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या कामाला येणार गती

नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या कामाला येणार गती
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या कामाला येणार गती

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असली तरी जलयुक्त शिवार अभियानाची कामे जोरात सुरू असल्याची माहिती प्रशासन देत आहे. गतवर्षीची कामे सुरू असली तरी यंदाची (२०१८-१९) आत्तापर्यंत सुमारे एक हजार एकशे सत्तर कामे सुरू केली आहेत. त्यातील चारशे वीस कामे पूर्ण झाली आहेत. मागील तीन वर्षांत जलयुक्तची कामे वेगाने सुरू नव्हती. यंदा मात्र कामे करण्याला संधी असल्याने या वर्षभरातील कामे याच वर्षात पूर्ण होतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

टंचाईने होरपळलेल्या गावांत सिंचनाची कामे करून गावे पाणीदार करण्यासाठी चार वर्षांपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. कृषी आणि अन्य विभागाकडून केली जाणाऱ्या सिंचनाच्या वेगवेगळ्या योजनांचा ताळमेळ घालून जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. सलग तीन वर्षे टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची यासाठी निवड झाली. नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या वर्षी २६४, दुसऱ्या वर्षी २७९ तिसऱ्या वर्षी २४१ तर यंदा २४८ गावांची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली आहे. 

अभियानातून आत्तापर्यंत सुमारे पंचवीस हजारांपेक्षा अधिक कामे केली असून, सुमारे चारशे कोटींपेक्षा जास्ती निधी खर्च झाला आहे. आता नगर जिल्ह्यामधील पाणलोट क्षेत्रातील व सिंचनाची सुविधा असलेली गावे वगळता अन्य गावे आता पूर्ण झाली आहेत. 

यंदा नगर जिल्ह्यामधील १९२ कोटी ८९ लाख रुपयांची सहा हजार नऊशे १३ कामे प्रस्ताविक केली आहेत, त्यातील आत्तापर्यंत ११७० कामे सुरू झाली असून, त्यातील १ कोटी ९९ लाखांची ४२० कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या तीन वर्षांत कामे रेंगाळली होती. यंदा मात्र मजुरांनाही रोजगाराची गरज आहे. कामे करण्याची संधी आहे. त्यामुळे जलुयक्तची कामे यंदा वर्षभरात पूर्ण होतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. जलयुक्तच्या कामाच्या समन्वयाची जबाबदारी कृषी विभागाकडे आहे. मात्र, अन्य योजनांवरही कामे करण्याची जबाबदारी असताना अन्य योजना मात्र कामे करण्यास फारसे धजावत नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

तालुका निहायपूर्ण झालेली कामे  नगर ः ४०, पारनेर ः ६ पाथर्डी ः ५२, कर्जत ः ७६, श्रीगोंदा ः ३६, जामखेड ः ०, श्रीरामपूर ः ३, राहुरी ः ० ,नेवासा ः ५, शेवगाव ः ४१, संगमनेर ः ७५, अकोले ः ४१, कोपरगाव ः ५, राहाता ः ४२.

आकडे बोलतात...  एकूण गावे ः २४८  एकूण आराखडा ः १९२ कोटी ८९ लाख  प्रस्ताविक कामे ः ६८१३  प्रशासकीय मान्यता दिलेली कामे ः ६३७९  कार्यारंभ आदेश दिलेली कामे ः २३२२  सुरू कामे ः ११७०  पूर्ण झालेली कामे ः ४२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com