agriculture news in Marathi speed for maintenance of sugar factory Maharashtra | Agrowon

साखर कारखान्यांची देखभाल दुरुस्ती गतीने

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखान्यांना नव्या हंगामासाठीची देखभाल दुरुस्तीचे काम किमान पंधरा दिवस अगोदरच करावी लागत आहे. 

कोल्हापूर: कोविडच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखान्यांना नव्या हंगामासाठीची देखभाल दुरुस्तीचे काम किमान पंधरा दिवस अगोदरच करावी लागत आहे. मशीनरिचे ओव्हर ऑईलिंगसह अनेक कामे आता मटेरियल मिळण्यास होणारा संभाव्य विलंब पाहून लवकरच सुरू करण्यात आल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

जे जुने आणि चांगल्या परिस्थितीतले नामवंत कारखाने आहेत. त्यांचे दुरुस्तीचे नियोजन ठरलेले असते. खराब झालेल्या पार्टची मागणी कारखाना व्यस्थापनाकडे केल्यानंतर कारखाना व्यवस्थापन पुरवठादाराकडे याची मागणी करते आणि तातडीने तो पार्ट कारखान्यांकडे पोच केला जातो. पण यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. जिल्हाबंदी व मुंबई पुण्याच्या बाजारपेठा औद्योगिक वसाहती बंद आहेत. याचा परिणाम यंत्राचे सुटे भाग मिळण्यावर होत आहे. 

विलंब होणार हे गृहीत धरून पुढील पंधरा दिवसात यंत्रांच्या ज्या तपासण्या कराव्या लागणार आहेत. त्या आत्तापासूनच केल्या जात आहेत. खराब झालेल्या भागाची यादी करून त्याची तातडीने मागणी केली जात आहे. यामुळे कारखान्याच्या तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची कामे वेगात आहेत. काही यंत्रसामग्री मिळण्यास अडथळे येत आहेत. त्यावर मार्ग काढून ही यंत्रसामग्री मागवण्यासाठी कारखान्यांचे तांत्रिक विभाग प्रयत्न करत असल्याचे चित्र बहुतांशी कारखान्यात आहे.

प्रतिक्रिया
कोविडच्या संकटामुळे यंत्रसामग्री उशिरा मिळेल ही शक्यता अगोदरच गृहीत धरून आम्ही भविष्यातील कामे आताच सुरू ठेवली आहेत. तातडीने निर्णय घेऊन खराब पार्टची आताच मागणी नोंदवली जात आहे. 
- विश्वजीत शिंदे, प्रोडक्शन मॅनेजर, दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...
कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपलेपुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या...
टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढगनाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप...
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...