सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेग

सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेग
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेग

सांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला आहे. यंदा हळदीच्या क्षेत्रात १६५ हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे. तिच्या काढणीस पंधरा दिवसानंतर गती येणार आहे. सुरवातीला पाऊस चांगला झाल्याने पीक चांगले होते. मात्र, नंतर पावसाचा खंड पडल्याने वाढ मंदावली, फुटवे फुटण्यास मदत झाली नाही. यामुळे उत्पादनात ८ ते १० टक्के घट होण्याची शक्यता असल्याचे हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी सांगितले. 

सांगली जिल्ह्यात यंदा १ हजार १३५ हेक्टर हळदीचे क्षेत्र आहे. ८० टक्के क्षेत्रावर सेलम, १५ टक्के क्षेत्रावर कृष्णा, ५ टक्के क्षेत्रावर फुले स्वरूपा या जातीच्या हळदीची लागवड करण्यात येते. गेल्या वर्षी हळदीचे क्षेत्र १३०० हेक्‍टर होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात दरात घसरण झाली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. 

हंगामाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने हळदीची चांगली वाढ झाली. रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नंतर पावसाचा खंड पडला. यामुळे हळदीची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यानंतर थंडीमुळे काही प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. याचा परिमाण थेट उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज तालुक्‍यांतील शेतकरी हळद काढणीसाठी नियोजन करत आहेत. काढणीसाठी ३० ते ४० टक्के शेतकरी यंत्राचा वापर करत आहेत, तर ६० ते ७० टक्के शेतकरी हळदीची काढणी मजुरांद्वारे करीत आहेत. यामुळे खर्चात बचत होण्यास मदत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com