agriculture news in Marathi, The spell of the juggling season ended in just three months | Agrowon

शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन महिन्यांत संपला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे पाच महिने चालणारा गूळ हंगाम यंदा अवघ्या तीन महिन्यांत संपला. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात गुळाला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलला दर कमी मिळाला. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे पाच महिने चालणारा गूळ हंगाम यंदा अवघ्या तीन महिन्यांत संपला. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात गुळाला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलला दर कमी मिळाला. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

शिराळा तालुका हा गूळ उत्पादनाचे आगार मानले जाते. परंतु, मजुरांची टंचाई आणि गूळनिर्मितीसाठी लागणारा कुशल गुळव्या यांची वानवा असल्याने गुऱ्हाळघरे संकटात आली आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात अंदाजे ३ ते ५ गुऱ्हाळघरे सुरू झाली होती. साखर कारखान्यांनी उसाचे दर जाहीर केले नसल्याने त्याचा फटका गुळाच्या दरावर झाला. त्यातच शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात अतिपावसामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम गुळाच्या उताऱ्यावर झाला. गेल्यावर्षी दोन टन उसाचे गाळप केल्यानंतर ३१० ते ३२० किलो गुळाचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा दोन टन उसाचे गाळप केल्यानंतर २५० ते २६० किलो गूळ मिळाला. याचाच अर्थ असा की, ५० ते ६० किलोचा उतारा कमी मिळाला. 

अपेक्षित दर नाही 
शिराळा तालुक्‍यातील सर्वच गूळ उत्पादक शेतकरी कऱ्हाड (जि. सातारा) येथील बाजार समितीत गुळाची विक्री करतात. हंगाम सुरू होताना गुळाचे कमीच होते. साखर कारखान्यांनी उसाचा दर करण्यास विलंब केला. त्याचा फटका गुळाच्या दरावर झाला असे गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे बाजार समितीत गेल्या वर्षी ५ हजार रुपये मिळाला होता. यंदा याच गुळाला ८०० ते १ हजार २०० रुपयांनी दर कमी मिळाल्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अतिपावसाने उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच गुळाचा उताराही कमी मिळाला. त्यात गुळाला अपेक्षित दर मिळाला नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 
- कुलदीप देशमुख, गूळ उत्पादक आणि गुऱ्हाळ घर मालक, कोकरुड, जि. सांगली
 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...