लिंबूवर्गीय फळपिकावरील कोळीचे व्यवस्थापन

कोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरी प्रामुख्याने ऑगष्ट ते ऑक्टोबरमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते.सध्या मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद जिल्ह्यात मोसंबी क्षेत्रामध्ये व अन्य जिल्ह्यात संत्रा बागेमध्ये कोळीचा प्रादूर्भाव वाढताना दिसतो.
Spider management on citrus fruits
Spider management on citrus fruits

कोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरी प्रामुख्याने ऑगष्ट ते ऑक्टोबरमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते.सध्या मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद जिल्ह्यात मोसंबी क्षेत्रामध्ये व अन्य जिल्ह्यात संत्रा बागेमध्ये कोळीचा प्रादूर्भाव वाढताना दिसतो. सध्या मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा व लिंबू फळपिकावर कोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही भागात कोळी किडीने आर्थिक नुकसान पातळी देखील ओलांडली आहे.  कोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरी प्रामुख्याने ऑगष्ट ते ऑक्टोबरमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते.सध्या मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद जिल्ह्यात मोसंबी क्षेत्रामध्ये व अन्य जिल्ह्यात संत्रा बागेमध्ये कोळीचा प्रादूर्भाव वाढताना दिसतो. किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून तातडीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.  ओळख  कोळी ही अष्टपाद वर्गातील कीड असून, आकाराने सुक्ष्म आहे. ती सहजासहजी डोळ्याने दिसत नाही. कोळीची प्रौढ व पिल्ले पिवळसर असून त्यांच्या फक्त आकारात फरक असतो. कोळी पानांच्या शिराजवळ व फळाच्या सालीवर अंडी घालतात.  प्रादुर्भावाची लक्षणे  प्रौढ व पिल्ले पानातील व फळातील रस शोषण करतात. त्यामुळे पानावर राख किंवा धुळ साचल्याप्रमाणे पानाचा पृष्ठभाग धुळकट दिसतो. प्रादुर्भाव जास्त झाल्यास करड्या रंगाचे चट्टे पडलेले दिसतात. असा भाग वाळतो. यालाच अनेक शेतकरी लाल्या या नावानेही ओळखतात. किडीच्या प्रादुर्भावामुळे अनियमित आकाराची फळे तयार होतात. त्याची प्रत  खालावते.  व्यवस्थापन  कोळीचा प्रादुर्भाव दिसताच डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. वेळीच कोळी नियंत्रणासासाठी प्रयत्न करावेत. होणारे नुकसान टळेल.  दुसरी फवारणी आवश्यकता असल्यास १५ दिवसांच्या अंतराने करावी. संपर्क- डॉ. अनंत बडगुजर, ७५८८०८२०२४,  : डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००, (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com