agriculture news in marathi, Spodoptera frugiperda seen on cotton for Marathawada | Agrowon

मराठवाड्यातही कपाशीवर लष्करी अळीचा आढळ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

परभणी : जिल्ह्यात मका पिकापाठोपाठ कपाशीवर काही भागांत अमेरिकन लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मांडाखळी (ता. परभणी) शिवारात मक्यावरील लष्करी अळीने कपाशीच्या पिकाकडे मोर्चा वळवला आहे. या गावातील बीटी कपाशीच्या पिकामध्ये काही प्रमाणात अमेरिकन बोंड अळी (हेलीकोव्हर्पा आर्मीजेरा)चा प्राद्रुर्भाव झाल्याचे देखील आढळून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

परभणी : जिल्ह्यात मका पिकापाठोपाठ कपाशीवर काही भागांत अमेरिकन लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मांडाखळी (ता. परभणी) शिवारात मक्यावरील लष्करी अळीने कपाशीच्या पिकाकडे मोर्चा वळवला आहे. या गावातील बीटी कपाशीच्या पिकामध्ये काही प्रमाणात अमेरिकन बोंड अळी (हेलीकोव्हर्पा आर्मीजेरा)चा प्राद्रुर्भाव झाल्याचे देखील आढळून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

यंदाच्या जिल्ह्यात मका पिकाची ८७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कणसे येण्याच्या आधी मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आला. पावसाच्या खंड काळात लष्करी अळीचा उद्रेक झाला होता. अनेक ठिकाणी ५० ते ७० टक्के पर्यंत प्रादुर्भाव आढळून आला होता. सिंगणापूर (ता. परभणी) येथील शेतकरी एकनाथराव साळवे यांच्या १३ एकरवरील मका पिकांवर सुरवातीच्या काळात ५० टक्केपर्यंत लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे प्रादुर्भाव २ ते ३ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे. मांडाखळी (ता. परभणी) येथील महादेव राऊत यांच्या शेतामधील अर्धा एकरवरील मक्याची कणसे लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नष्ट झाली आहेत. मका पिकांच्या शेजारील भानुदास राऊत यांच्या बीटी कपाशी पिकावर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी तसेच अमेरिकन बोंड अळी (हिरवी बोंड अळी) (Helicoverpa Armigera) प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. अमेरिकन बोंड अळी पाते, फुले, बोंडाना डंख मारून नुकसान करत आहे. मांडाखळी शिवारातील अन्य काही शेतकऱ्यांच्या कपाशीवर देखील अमेरिकन बोंड अळी आढळून आली.

अर्धा मक्याचे पीक पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले आहे. कणसे बाजूला टाकून मक्याचा चारा म्हणून वापर करत आहोत. कपाशीवर देखील ही अळी आढळून आली आहे. प्रादुर्भावचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना उपाययोजना सांगाव्यात.  
- महादेव राऊत, शेतकरी,  मांडाखळी

तेरा एकरवर मक्यावर सुरवातीच्या काळात ५० टक्क्यांपर्यंत लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. कीटकनाशकांच्या फवारणीनंतर ती नियंत्रणात आली. ६ एकर मक्याचे सायलेज केले. ७ एकरवरील मक्याचे उत्पादन घेत आहे. सद्य:स्थितीत मक्यावर लष्करी अळीचा २ ते ३ टक्के प्रादुर्भाव दिसत आहे.
- एकनाथराव साळवे, शेतकरी, सिंगणापूर, जि. परभणी

यंदा बीटी कपाशीच्या बियाणामध्ये नॉन बीटी कपाशीच्या बियाणे मिसळून देण्यात आले आहे. त्यामुळे कपाशीमध्ये अमेरिकन बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. ज्वारी, बाजरी तसेच काही ठिकाणी मक्यावरदेखील या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आहे. मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी कपाशीची पाने, फुले तसेच बोंडांचे नुकसान करते; परंतु कपाशीवरील लष्करी अळीचे नियंत्रण हिरव्या बोंड अळीप्रमाणे करता येते.
- डॅा. बी. व्ही. भेदे, कीटकशास्त्रज्ञ, 
वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी

 


इतर अॅग्रो विशेष
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...
भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढकोल्हापूर: कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या...
वऱ्हाडात जोरदार, मराठवाड्यात सर्वदूर...पुणे ः राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात...
`सीसीआय`कडून सहा कोटी क्विंटल कापूस...नागपूर : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय)...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...