agriculture news in marathi, Spodoptera Furgiparda seen on sugarcane in Satara district | Agrowon

सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापूर, अतिपावसामुळे पीक कूज, तणांचे वाढते प्रमाण, मका पिकांवर अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव संकटाबरोबर आता जिल्ह्यात सर्वाधिक असलेल्या उसावरही या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापूर, अतिपावसामुळे पीक कूज, तणांचे वाढते प्रमाण, मका पिकांवर अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव संकटाबरोबर आता जिल्ह्यात सर्वाधिक असलेल्या उसावरही या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण, कऱ्हाड, सातारा तालुक्यांतील नदीच्या काठची शेकडो गावांत महापूर आल्याने हजारो हेक्टर शेतीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अति व संततधार पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत. हे कमी होते काय म्हणून आले पिकांस कंद कुज तर अडीच हजार हेक्टरपेक्षा मका पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळीचा प्रादुर्भाव आता उस पिकांवर झाल्याचे दिसून येऊ लागला आहे. ही अळी उसाची पाने कुडतरत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

सध्या उसावर प्रादुर्भाव कमी असला तरी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले जात असल्याने या किडीचा प्रभाव वाढू शकतो. नवीन झालेल्या ऊस लागवडीस तुलनेत प्रमाण जास्त आहे. शेतकरी विविध संकटामुळे अडचणीत असतानाच या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. 

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. सध्या प्रादुर्भाव कमी असला तरी भविष्यात वाढल्यावर नुकसान होऊ शकते. यासाठी ऊस तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
- सौरभ कोकीळ, ऊसभूषण, धामणेर, जि. सातारा
 


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...