नाशिक येथे आंबा महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक येथे आंबा महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक येथे आंबा महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या योजनेअंतर्गत नाशिक बाजार समितीतर्फे आंबा महोत्सवाला पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केटमध्ये सुरवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.  बाजार समितीच्या वतीने हा पहिल्याच आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नाशिककरांना स्वस्त व नैसर्गिकरीत्या पिकविलेला कोकणातील हापूस व गुजरातमधील केसर, तसेच बाजारातील विविध प्रकारच्या आंब्यांच्या जाती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ५ दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २९ मे ते २ जून या दरम्यान आंबा महोत्सव होणार आहे.  या वेळी बबनराव घोलप म्हणाले, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी असे महोत्सव गरजेचे आहे. बाजार समितीचे सभापती श्री. चुंभळे यांनी  पुढील वर्षी अशाच स्वरूपाचा महोत्सव मोठ्या प्रमाणात भरविण्याचा मानस असल्याचे सांगितले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती युवराज कोठुळे, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे विभागीय सरव्यवस्थापक जयेश आहेर, तालुका संघाचे संचालक सोमनाथ बेंडकुळे, संजय इंगळे, प्रभाकर माळोदे, मनोज नलावडे, आंबा उत्पादक संघाचे चंद्रकांत मोकळ आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com