Agriculture news in Marathi Spontaneous support to the public curfew in Solapur | Agrowon

सोलापुरात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त पाठिंबा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 मार्च 2020

सोलापूर ः ‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला सोलापूर जिल्ह्यात रविवारी (ता. २२) सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील मोजके कर्मचारी वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत छोटी-मोठी दुकाने, बाजारपेठा बंद राहिल्या. रस्त्यावर निर्मनुष्य आणि शुकशुकाटाचे चित्र राहिले. विशेषतः रोज हजारो यात्रेकरूंच्या संख्येने गजबजणारे पंढरपूर आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्रातील रस्ते आणि चौकांनीही पहिल्यांदाच पूर्णपणे मोकळा श्वास घेतला.

सोलापूर ः ‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला सोलापूर जिल्ह्यात रविवारी (ता. २२) सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील मोजके कर्मचारी वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत छोटी-मोठी दुकाने, बाजारपेठा बंद राहिल्या. रस्त्यावर निर्मनुष्य आणि शुकशुकाटाचे चित्र राहिले. विशेषतः रोज हजारो यात्रेकरूंच्या संख्येने गजबजणारे पंढरपूर आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्रातील रस्ते आणि चौकांनीही पहिल्यांदाच पूर्णपणे मोकळा श्वास घेतला.

कोरोनाचे संकट आज देशभर घोंगावत आहे. त्यात महाराष्ट्रातील संख्या वाढत असताना सोलापुरात आतापर्यंत १३ संशयित रुग्ण आढळले. पण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या उंबरठ्यावर कधीही कोरोना येऊन धडकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना, दुकाने, हॉटेल्स, थिएटर, बार, मॅाल यांसारखी वर्दळीची सर्व ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

त्यानुसार सर्वांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत पाठिंबा दिला असताना, आज जनता कर्फ्यू पुकारण्यात आल्याने त्यालाही लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत घरीच राहणे पसंद केले. सकाळी सात वाजता हा कर्फ्यू सुरू होणार असला, तरी सकाळी सहा वाजल्यापासूनच सर्व चौक, रस्ते निर्मनुष्य झाले. एरव्ही पहाटेपासूनच गजबजणारी मॅार्निंगवॅाकची ठिकाणे, रस्ते, क्रीडा मैदाने रविवारी मोकळी राहिली.

पंढरपूर, अक्कलकोटने घेतला मोकळा श्वास 
एरव्ही रोज हजारोंच्या संख्येने पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी होते. पण दोन-तीन दिवसांपासून आधीच ही मंदिरेही दर्शनासाठी पूर्णपणे बंद केली असली, तरी आज कर्फ्यूमुळे या शहरातही रस्त्यावर निर्मनुष्य स्थिती राहिली. त्यामुळे पहिल्यांदाच या तीर्थक्षेत्रातील रस्ते आणि बाजारपेठांनी मोकळा श्वास घेतला. 

शेतकऱ्यांनीही कामे थांबवली 
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. सध्या त्यांच्या दृष्टीने कामाची घाई आहे. पण पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आजच्या एकदिवसाच्या कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यासाठी ही कामेही थांबवत घरीच राहण्याचे पसंत केल्याचे चित्र अनेक भागात राहिले. 
 


इतर ताज्या घडामोडी
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...