Agriculture news in marathi Sporadic rains in many parts of Khandesh | Agrowon

खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

जळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात तुरळक पाऊस झाला. कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही. कोरडवाहू कापूस, ज्वारी आदी पिकांच्या जोमदार वाढीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात तुरळक पाऊस झाला. कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही. कोरडवाहू कापूस, ज्वारी आदी पिकांच्या जोमदार वाढीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

खानदेशात धुळे व नंदुरबारात काही भागात रविवारी चांगला पाऊस झाला. त्यात शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा भागात अनेक भागात चांगला पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर आदी भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. कुठेही अतिवृष्टी झाली नाही. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कारण, ज्वारी, मका पिके निसवली आहेत. परंतु, चांगला पाऊस नसल्याने निसवणीवर हलक्या व मध्यम जमिनीत परिणाम दिसत आहे. 

जळगाव जिल्ह्यात यावल, जळगाव भागात १२ ते १३ दिवसांपासून पावसाचा खंड आहे. उडीद, मूग ही पिके हातची गेल्याची स्थिती आहे. कोरडवाहू कापूस, ज्वारी, मका या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. खानदेशात शनिवारी (ता.८) अनेक भागात हलका पाऊस झाला. पावसाची टक्केवारी जळगाव जिल्ह्यात सुमारे ५४, धुळ्यात ५६, तर नंदुरबारात ५० टक्के एवढी आहे. एकाच दिवसात अतिजोरदार पाऊस झाला. जूनमध्ये १५ दिवस, तर जुलैमध्येही १० ते ११ दिवस पाऊस नव्हता. या महिन्यातही पाऊस हवा तसा नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जोरदार पाऊस नसल्याने खानदेशातील पांझरा, वाघूर, गिरणा, अंजनी, हिवरा या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. मध्यंतरी काही मध्यम प्रकल्प भरले आहेत. परंतु, मागील १२ ते १३ दिवसांपासून पाऊस नसल्याने वाघूर, गिरणा, अंजनी, बहुळा, बोरी, पांझरा, मालनगाव आदी प्रकल्पांच्या जलसाठ्यात फारशी वाढ झाली नसल्याची स्थिती आहे. रविवारचा पाऊस (मि.मी) - जळगाव ७, चोपडा १३, यावल ८. शिंदखेडा १४, शिरपूर ११, तळोदा १५. 
 


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...