agriculture news in marathi, Spread the farmers 'Vasaka' administration | Agrowon

शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेराव
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

नाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना हा धाराशिव कारखान्याला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. मात्र भाडेकरू संस्थेने कामगार व उसाचे पेमेंट अद्यापपर्यंत न दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला घेराव घातला.

नाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना हा धाराशिव कारखान्याला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. मात्र भाडेकरू संस्थेने कामगार व उसाचे पेमेंट अद्यापपर्यंत न दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला घेराव घातला.

धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून सुरवातीला दोन महिने कारखाना सुरळीत चालू होता. कारखान्‍याचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखाना कार्यस्थळावर ठरल्याप्रमाणे संस्थेने कामगार संघटनेशी करार केला नाही. त्यामुळे कामगारांना आपले थकीत वेतन मिळाले नाही. त्यासाठी कामगारांनी २२ जानेवारीपासून काम बंद उपोषण पुकारले होते. मात्र, अाश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची उसबिले अजूनही अदा केली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी कारखाना व्यवस्थापनाने दिलेले धनादेश वटले नाहीत. ते परत मागून घेण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांनी अनेकदा धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना फोनद्वारे संपर्क केला. मात्र, त्यांनी फोन स्वीकारलेला नाही. त्यामुळे शेतकरी व कर्मचारी विवंचनेत आहेत. 

शेतकऱ्यांचा संताप
'वसाका'साठी कळवण, देवळा, चाळीसगाव, साक्री तालुक्यांबरोबरच आजूबाजूच्या ठिकाणांहून ऊस गळितासाठी पाठविला जातो. मात्र, उसाची बिले न मिळाल्याने ऊस उत्पादकांनी धाराशिव कारखान्याच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली. मात्र, म्हणणे ऐकून घेण्यासाठी कार्यालयात कोणीही उपलब्ध नव्हते. त्यानंतर कारखान्याच्या विश्रांतीगृहात अधिकारी असल्याचे समजले. उत्पादक या ठिकाणी पोचले. मात्र, प्रशासकीय अधिकारी मनोहर जावळे यांनी ऊस बिलाबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे उत्पादकांनी याठिकाणी संताप व्यक्त केला.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...