गटशेतीमधून नवतंत्रज्ञान, पूरक उद्योगाचा प्रसार : अजिंक्य बेर्डे

30jan2020_1.jpg
30jan2020_1.jpg

आंबा : शेतीमधील नवीन तंत्रज्ञान आंबा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी मोनेरा शेतकरी गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या माध्यमातून भात, नाचणी, ऊस, भाजीपाला, रताळी उत्पादक शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान पोचवण्याचा प्रयत्न आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार विविध योजना आणि कृषिपूरक उद्योगाला चालना देण्याचे नियोजन केले आहे. गटातील उत्पादने ''मोनेरा'' या ब्रँडने विक्री केली जाणार आहेत, अशी माहिती मोनेरा शेतकरी गटाचे अध्यक्ष अजिंक्य बेर्डे यांनी दिली. प्रजासत्ताकदिनी (ता. २६) मोनेरा शेतकरी गटाची स्थापना झाली. त्या वेळी ते बोलत होते. गटाची नोंदणी कृषी विभागाकडे करण्यात आली आहे. गटात आंबा पंचक्रोशीतील २१ शेतकरी सहभागी झाले आहेत. या वेळी डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते राजेंद्र लाड यांनी शेतीपूरक उद्योग व उत्पादन ते विक्री कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले. ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे विनायक गद्रे यांनी जमीन सुपीकता जपत पीक व्यवस्थापन करावे. स्वतः गांडूळ खत, दशपर्णी अर्क तयार करावा. एकत्रित शेती आणि एकत्रित विक्रीचे नियोजन करावे, असे मार्गदर्शन केले. गटाच्या माध्यमातून माती परीक्षण, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी, पशुपालन, गांडूळखत निर्मिती, कोंबडी पालन, अभ्यास सहली, मत्सपालन, कृषी पर्यटन आदी व्यवसायात उतरण्याची तयारी सदस्यांनी दर्शवली. कडवी खोऱ्यातील तळवडे, टेकोली, कडवे, मलकापूर, परळे निनाई, सांबू, मलकापूर शिराले, आंबा येथील गटाचे सदस्य उपस्थित होते. कॉलेज विद्यार्थी बाजीराव पाटील याने आदर्श गोठा प्रकल्प तर शिराळ्याचे वैभव पाटील याने शेतीत करिअर करण्याचे स्पष्ट केले. कुणाल शित्तूरकर यांनी आभार मानले. ग्रंथालय भेट शेतीचे नवे प्रयोग, यशोगाथा, सेंद्रिय शेती, पूरक व्यवसाय यासह शेतीवर अधारीत साठ पुस्तकांचे ग्रंथालय अमित गद्रे यांनी शेतकरी गटाला या वेळी भेट दिले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी नव्या सदस्याच्या शिवारात गटाची बैठक घेऊन शिवार फेरी घेतली जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com