Agriculture news in marathi, `Spread the technology of low production costs` | Agrowon

`कमी उत्पादन खर्चाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करा`

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नांदेड : ‘‘शेतकरी शेतीशाळांद्वारे कृषी निविष्ठांवरील खर्च कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रसार करा. पिकांच्या उत्पादनवाढीसह शेतीपूरक पशुपालन, दुग्ध व्यवसायातील उत्पन्नासाठी रब्बी हंगामात चारा पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावा,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

नांदेड : ‘‘शेतकरी शेतीशाळांद्वारे कृषी निविष्ठांवरील खर्च कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रसार करा. पिकांच्या उत्पादनवाढीसह शेतीपूरक पशुपालन, दुग्ध व्यवसायातील उत्पन्नासाठी रब्बी हंगामात चारा पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावा,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे बुधवारी (ता. ९) धनेगाव (ता. नांदेड) येथील जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिकेत रब्बी हंगामपूर्व प्रशिक्षण, वृक्षारोपन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी डोंगरे होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव (नांदेड), एम. के. सोनटक्के (देगलूर), बी. पी. कदम (किनवट), उपसंचालक वाय. व्ही. घुगे उपस्थित होते. 

डोंगरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी निविष्ठा, तसेच अन्य बाबींवर होणारा अनावश्यक खर्च कमी झाला पाहिजे. उत्पन्नाचा पर्यायी स्रोत म्हणून शेतीपूरक दुग्धव्यवसाय, पशुपालन व्यवसायासाठी चारा पिकांच्या लागवडीवर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शेतकरी शेतीशाळा हे प्रभावी माध्यम आहे.’’

काकडे म्हणाले, ‘‘कृषी विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी शेतकरी महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करावी. मक्यावरील लष्करी अळी इतर पिकावर येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी.’’

कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा. शिवाजी तेलंग, सगरोळीचे कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ कपील इंगळे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्र विशेषज्ञ संदीप जायभाये यांनी ‘रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापन’, ‘कीड, रोग व्यवस्थापन', ‘अन्नद्रव्य व्यवस्थापन’ याबाबत माहिती दिली. वृक्षारोपन करण्यात आले. एम. जी. चामे, एस. व्ही. सानप, वसंत जारीकोटे यांनी पुढाकार घेतला. तालुका कृषी अधिकारी आर. एम. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.


इतर बातम्या
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला...
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊसपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची...बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर...पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के...कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा...
पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद :...पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...