Agriculture news in Marathi Sprouts sprouted from sorghum grains in Akola | Agrowon

अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

यंदाच्या हंगामात असमतोल स्वरूपाचा पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तर काही ठिकाणी कमी पाऊस. यंदा पातूर तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी अधिक आहे. त्यामुळे पिकांचे नुकसानही मोठ्या क्षेत्रावर झाले.

अकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल स्वरूपाचा पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तर काही ठिकाणी कमी पाऊस. यंदा पातूर तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी अधिक आहे. त्यामुळे पिकांचे नुकसानही मोठ्या क्षेत्रावर झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या सलग पावसामुळे या तालुक्यात सोंगणी केलेल्या ज्वारीच्या कणसांमधून कोंब बाहेर आले असून रोप तयार होत आहेत. विवरा येथील रवींद्र शिरसाठ यांना ज्वारीच्या दोन एकरातील पिकापासून खायला दाणासुद्धा झालेला नाही.

विवरा परिसरात परतीच्या पावसाने मागील आठवड्यात सतत हजेरी दिली. शिरसाठ यांनी आॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात ज्वारीची सोंगणी केली होती. कणसे वाळल्यानंतर तातडीने त्यांची कापणी करून थ्रेशरच्या साह्याने ज्वारी काढून घेऊ असे त्यांचे नियोजन होते. मात्र, एकदा सुरू झालेला पाऊस आठ-दहा दिवस सातत्याने हजेरी देत होता. यामुळे जमिनीवर पडलेले ज्वारीचे पीक वाया गेले. ज्वारीला चांगले दर मिळत असल्याचे पाहून शिरसाठ यांनी दोन एकरात लागवड केली होती. चांगले व्यवस्थापन केले.

पाऊस समाधानकारक असल्याने पीक जोमदार होते. यामुळे ते चांगल्या उत्पादनाचे स्वप्न पाहत होते. पिकाचे एवढे नुकसान होईल, असे कधी स्वप्नातही पाहले नव्हते. सततच्या पावसामुळे ज्वारी आणि त्यापासून मिळणारा चारा, असा दोन्ही गोष्टी खराब झाल्या आहेत. प्रत्येक कणसाला कोंब फुटले. ज्वारी जमिनीवर पडलेली असल्याने पूर्ण खराब झाली आहे.

जून महिन्यात दोन एकरात लागवड केली. आत्तापर्यंत २० हजार रुपये खर्च लागला. हा परतीचा पाऊस यायच्या आधीच सोंगणी केली होती. नंतर सतत पाऊस सुरू राहिला. पूर्ण कणसातून कोंब आले आहेत. पिकाची आताची स्थिती पाहता काहीही उत्पादनाची चिन्हे नाहीत. शेतातील नुकसानाची अद्याप कोणीही पाहणी केली नाही.
- रवींद्र शिरसाठ,
शेतकरी, विवरा, ता. पातूर, जि. अकोला


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...