यवतमाळमध्ये आजपासून फवारणीबाबत जनजागृती मोहीम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  : मागील वर्षी फवारणी करताना विषबाधा होऊन २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. यंदा १३ रुग्णांना विषबाधा झाल्याचे निर्देशनास आले आहे. यंदा मागील वर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुरुवार (ता. २) ते शनिवार (ता. ४) दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक गावात फवारणीबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच दर १० दिवसांनी आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

मागील वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात फवारणी करताना विषबाधा होऊन २२ शेतकरी, शेतमजूर मृत्युमुखी पडले होते. यंदाही अशा प्रकारचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व विभागांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यात २ ते ४ ऑगस्टदरम्यान फवारणी जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश दिले.

मोहिमेत तालुकास्तरीय सर्व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त सर्व अधिकाऱ्यांचा सहभाग अत्यावश्‍यक करण्यात आला आहे. कर्मचारी संख्या व गाव यांचे वेळापत्रक तयार करून शक्‍य तितक्‍या गावांत जाण्याचे निर्देश दिले आहे. ज्या व्यक्ती फवारणी करतात, अशा व्यक्तींची दर दहा दिवसांनी आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • प्रत्येक गावाकरिता समन्वय अधिकारी नियुक्त.
  • गावनिहाय फवारणी करणाऱ्यांची यादी तयार करावी.
  • ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांची सहभाग आवश्‍यक.
  • कृषी केंद्रसमोर माहिती फलक लावण्याचे निर्देश.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com