Agriculture news in Marathi Sri Lanka launches 'surgical strike' on palm oil imports | Agrowon

पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर तत्काळ बंदी लावली आहे. त्याचबरोबर देशातील सर्व पाम तेल उत्पादक कंपन्यांना १० टक्के पामची झाडे उपटून त्या जागेवर रब्बर किंवा इतर पर्यावरणासाठी अनुकूल झाडांची लागवड करण्याचे आदेश दिले आहेत.

कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर तत्काळ बंदी लावली आहे. त्याचबरोबर देशातील सर्व पाम तेल उत्पादक कंपन्यांना १० टक्के पामची झाडे उपटून त्या जागेवर रब्बर किंवा इतर पर्यावरणासाठी अनुकूल झाडांची लागवड करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच देशात नवीन पाम झाडांची लागवड करण्यास बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजापक्ष यांनी आयात झालेल्या पाम तेलाच्या मालाला सीमेवर रोखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘श्रीलंकेला पाम तेलाच्या आयातीतून आणि वापरातून मुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे या अचानक घेतलेल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना राष्ट्राध्यक्ष राजापक्ष म्हणाले.

तरी टप्प्याटप्प्याने श्रीलंकेतील पाम तेलाची आयात आणि उत्पादन कमी करावे, अशी सूचना तेथील सरकारने सहा महिन्यांपूर्वीच दिली होती. देशातील पाम झाडांची लागवड कमी करण्याचे आदेशही देण्यात आले होते. तेथील सरकारने पाम तेलाची आयात थांबवून स्थानिक रब्बर आणि खोबऱ्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.

श्रीलंकेतील पाम तेल उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. देशात ११ हजार हेक्टरवर पाम तेलाची लागवड आहे. पामचे लागवड क्षेत्र रब्बर, खोबरे आणि चहाच्या लागवड क्षेत्राच्या एक टक्का आहे. पाम तेलाच्या लागवडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे श्रीलंकेतील पर्यावरण प्रेमी संस्थांचे म्हणणे आहे. तसेच श्रीलंका मलेशिया आणि इंडोनेशियामधून दरवर्षी दोन लाख टन पाम तेल आयात करते.

खोबरा उत्पादनात श्रीलंका चौथ्या स्थानी
या निर्णयामुळे श्रीलंकेतील पाम तेल उत्पादकांना जरी फटका बसणार असला, तरी तेथील ग्राहक संरक्षण संघटनेकडून या निर्णयाचे स्वागत झाले आहे. यामुळे स्थानिक खोबरा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. खोबऱ्याच्या उत्पादनात श्रीलंका जगात चौथ्या क्रमांकावर येतो. देशात चार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खोबऱ्याची लागवड होते आणि जवळपास ३०० कोटी नारळाचे नग इतके उत्पादन आहे.


इतर अॅग्रोमनी
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...
कापूस लागवडीत यंदा घट शक्यपुणे ः पुढील दोन ते तीन महिन्यांत खरीप लागवड सुरू...
भारताने आयात-निर्यात धोरणांत बदल करू नयेपुणे ः केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या...
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...