Agriculture news in Marathi Sri Lanka launchesCovid isolation center built through public participation | Agrowon

लोकसहभागातून उभारले कोविड आयसोलेशन केंद्र

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

शासकीय यंत्रणेवर भार कमी करण्याच्या उद्देशाने चिखली तालुक्यातील किन्होळा गावकऱ्यांनी जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन केंद्र उभारले आहे.

बुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणची कोविड आयसोलेशन केंद्र तुडुंब भरले आहेत. गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर भार कमी करण्याच्या उद्देशाने चिखली तालुक्यातील किन्होळा गावकऱ्यांनी जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन केंद्र उभारले आहे. लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून सुरू केलेले हे पहिले आयसोलेशन केंद्र असून, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. लोकसहभागातून कोविड आयसोलेशन केंद्राचा किन्होळा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर राबविणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या केंद्राचे उद्‍घाटन सोमवारी (ता. तीन) ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक प्रभूकाका बाहेकर यांच्या हस्ते झाले. या केंद्राचे मुख्य संकल्पक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, शासकीय कोविड केंद्राचे प्रभारी डॉ. सचिन वासेकर, चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ, सरपंच अर्चना वसंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘लोकसहभागातून आयसोलेशन केंद्र उभारण्याच्या उपक्रमाने मी भारावलो. गावकऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.’’ चावरिया, डॉ. वासेकर, तुपकर यांनी या वेळी गावकऱ्यांचे कौतुक केले.

या वेळी किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल साळोख, डॉ. अनिल पांढरे, डॉ. आकाश सदावर्ते, डॉ. स्वप्नील अनाळकर, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. भाग्यश्री खेडेकर, डॉ. दीपाली महाजन, गावच्या उपसरपंच कल्पना राजपूत, पोलिस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर, मधुकर बाहेकर, ग्रा. पं. सदस्य शेख आरिफ शेख रज्जाक, ग्रामसेवक रमेश मुंडे, कृषी सहायक विष्णू डुकरे, शेख ताहेर शेखजी, भगवानसिंह राजपूत, दिनकर बाहेकर, बबनराव बाहेकर, अॅड. विश्‍वासराव बाहेकर, शिक्षक यांच्यासह अनेक उपस्थित होते.


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...