Agriculture news in Marathi, ST bus in WiFi service off | Agrowon

एसटी बसमधील ‘वायफाय’ सेवा बंद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना बसमधून उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने नवनवीन सुविधा देण्यास सुरवात केली. यात मनोरंजनासाठी वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली. मात्र, ही सेवा प्रवाशांपर्यंत कधीच ‘कनेक्‍ट’ झाली नसून, ती आजवर ‘डिस्कनेक्‍ट’च आहे. त्यामुळे बसमध्ये लावलेले ‘वायफाय’ सेवेचे बॉक्‍स केवळ ‘शोपीस’ ठरत आहेत. 

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना बसमधून उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने नवनवीन सुविधा देण्यास सुरवात केली. यात मनोरंजनासाठी वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली. मात्र, ही सेवा प्रवाशांपर्यंत कधीच ‘कनेक्‍ट’ झाली नसून, ती आजवर ‘डिस्कनेक्‍ट’च आहे. त्यामुळे बसमध्ये लावलेले ‘वायफाय’ सेवेचे बॉक्‍स केवळ ‘शोपीस’ ठरत आहेत. 

राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसमध्ये प्रवाशांसाठी सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सुविधांचा लाभ प्रवाशांना होत नसल्याने बोजवारा उडाला आहे. बसमध्ये असलेली प्रथमोपचार पेटी नेहमी रिकामीच असल्याची स्थिती आहे. तसेच आग विझविण्यासाठीचे सिलिंडरही अनेक बसमध्ये नाही. अगदी भंगार अवस्थेतील बस रस्त्यावरून धावते. तिच्या खिडक्‍या तुटलेल्या, पत्र्याचाही मोठ्या प्रमाणात आवाज येतो. तसेच एसटीत नव्याने दाखल झालेल्या ‘शिवशाही’ बसची देखील तीच स्थिती झाली असून, तुलनेत खासगी ट्रॅव्हल्समध्ये या सुविधांवर अधिक भर दिला जात असल्याचे पाहावयास मिळते. 

‘एसटी’ बसमध्ये केवळ औपचारिकता म्हणून सेवा पुरविल्या जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवलेल्या प्रथमोपचार पेट्यांचा वापर अपघातावेळी होऊ शकेल, अशा सुस्थितीत त्या अजिबात नसल्याचे चित्र बसमध्ये पाहावयास मिळते. 

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ‘वायफाय’ सुविधा पुरविण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्‍ट’ही देण्यात आला होता. परंतु, ही सुविधा आजवर सुरूच झालेली नाही. बसमध्ये मनोरंजनासाठी लावलेल्या ‘वायफाय’च्या बॉक्‍समधून निघणारी ‘रेंज’ प्रवाशांच्या मोबाईलपर्यंत पोचलेलीच नाही. त्यामुळे हे बॉक्‍स नावालाच उरले आहेत. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिऱ्यांना वेळच नसल्याचे चित्र यावरून स्पष्ट होत आहे.

बसमध्ये ‘वायफाय’ सेवा सुरू करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून झालेला होता. आता ती सेवा बंद झाल्याचा निर्णयही तिकडूनच झाला. सेवा सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीने ती उपलब्ध करून दिली होती. ही सेवा बंद झाल्याने ‘एसटी’ला कोणत्याही प्रकारचा तोटा नाही. 
- राजेंद्र देवरे, 
विभाग नियंत्रक, रापम, जळगाव विभाग


इतर बातम्या
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...