agriculture news in Marathi ST loss reached at 6 thousand crore Maharashtra | Agrowon

लालपरीचा संचित तोटा सहा हजार कोटींवर 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जून 2020

लॉकडाउनच्या शिथिलतेनंतरही एस.टी. महामंडळास दररोज सुमारे २३ कोटींचा फटका बसू लागला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.

सोलापूर : लॉकडाउनच्या शिथिलतेनंतरही एस.टी. महामंडळास दररोज सुमारे २३ कोटींचा फटका बसू लागला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. संचित तोटा आता सहा हजार कोटींवर पोहोचल्याने जनतेची लालपरी टिकविण्यासाठी सरकारने महामंडळाला दोन हजार कोटींची मदत करावी, असे पत्र कामगार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लिहिले आहे. 

उत्पन्नात घट झाल्याने राज्य सरकारने सवलत मूल्यांपोटी चारशे कोटी रुपये दिल्यानंतर एस.टी. महामंडळातील कामगारांचा पगार झाला. आता जूनच्या वेतनाची चिंता लागली असून, शासनाने उर्वरित २७० कोटी रुपये दिल्यानंतर मे देय जूनचा पगार ५० टक्‍के करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे.

दोन महिने उशिराने वेतन मिळूनही त्यात कपात केल्याने कामगारांत असंतोष पसरला आहे. दुसरीकडे संचित तोटा वाढू लागल्याने महामंडळाने रोजंदारी कर्मचाऱ्यांना काम देणे बंद केले असून, अनुकंपाखालील लिपिक, टंकलेखक व सहायकांचे काम थांबविण्याचाही निर्णय घेतला आहे. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आता महामंडळाच्या मालकीच्या काही जागांची विक्री करण्याचाही निर्णय झाला आहे. 

एसटी महामंडळाची सद्यःस्थिती 

एकूण कर्मचारी 
१.०५ लाख 

महामंडळाचे वार्षिक उत्पन्न 
२७६ कोटी 

दरवर्षीचा अंदाजित खर्च 
२८९ कोटी 

महामंडळाचा संचित तोटा 
६,१०० कोटी 

उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढला 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा २०१४-१५ मध्ये संचित तोटा एक हजार ६८५ कोटी रुपये होता. मात्र, खासगी वाहतुकीशी स्पर्धा करणारी लालपरी मागे पडली आणि २०१९-२० मध्ये हा संचित तोटा सहा हजार कोटींवर पोहचला. डिझेल खर्च, बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च आणि वेतनावरील खर्चही उत्पन्नातून निघत नाही, अशी अवस्था झाली.

आता कोरोनामुळे जिल्हाबंदी असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अंतर्गत वाहतूक सुरू आहे. मात्र, प्रवासीच नसल्याने डिझेलचाही खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत बाराही महिने गोरगरिबांची सेवा करणारी लालपरी वाचविण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, अशी विनंती कामगारांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विक्री साखळी सक्षमीकरणाची सुवर्णसंधी शेतमालाचे उत्पादन घेणे हे काम फारच खर्चिक आणि...
कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' संजीवनी  या पुढे वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोयाबीन बियाणे नापासचे प्रमाण ६५ टक्केपरभणी: परभणी येथील कृषी विभागाच्या बीज...
‘पणन’च्या सुविधा केंद्रातून ६४८ टन...नाशिक: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या भेंडी...
कृषी खाते म्हणते, पुरेशी खते उपलब्धपुणे: राज्यात खताची टंचाई नाही. मात्र, यंदा...
देशातून आत्तापर्यंत साखरेची ४८ लाख टन...कोल्हापूर: देशातून आत्तापर्यंत ४८ लाख ६९ हजार टन...
खत ‘आणीबाणी’ने शेतकरी त्रस्तपुणेः खरिपाची पेरणी झाल्यानंतर पिके बहारात असून...
खरेदी बंद; शेतकऱ्यांचा मका घरातच औरंगाबाद : आधारभूत किमतीने सुरु असलेली मका खरेदी...
धीरज कुमार यांनी कृषी आयुक्तपदाची...पुणे: राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
देशात खरिपाची पेरणी ५८० लाख हेक्टरवरपुणेः देशात आत्तापर्यंत खरिपाची ५८० लाख हेक्टरवर...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...