सातारा  जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटी पास
सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटी पास

सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटी पास

सातारा : शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर जाग आलेल्या एसटी महामंडळाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना तातडीने पास द्यावेत, असा आदेश वडूज व दहिवडी आगार व्यवस्थापकांना देण्यात आला. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक रवींद्र पळसुले  यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना तसे लेखी आश्‍वासन  दिले.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाने मोफत प्रवासाचे पास अद्याप दिले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप जाधव यांनी गुरूवारी (ता.७) मुख्य बस स्थानकातून वडूज, खटाव, पुसेसावळी आदी भागांत जाणाऱ्या बस रोखल्या. जोपर्यंत विभाग नियंत्रक स्वतः येऊन विद्यार्थ्यांना पास देण्याचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत बस सोडल्या जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्यासमवेत शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदेही होते.

पळसुले मुख्य बस स्थानकात पोचल्यानंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्या वेळी प्रताप जाधव म्हणाले,"वडूज, खटावमधील निमसोड, मायणी, पुसेगाव, बुध, खटाव, औंध, पुसेसावळी, कातरखटाव या मंडलांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास अद्याप दिलेले नाहीत. राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दुष्काळग्रस्तांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची खंत आम्हाला वाटते.''

पळसुले यांनी संबंधित तहसीलदार कार्यालयाने विद्यार्थ्यांची यादी एसटी महामंडळास पाठविली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. जाधव यांनी प्रशासकीय विलंबाची कारणे देऊ नका, विद्यार्थ्यांना पास द्या, अशी ठाम भूमिका घेतली. अखेर पळसुले यांनी वडूज व दहिवडी आगार व्यवस्थापकांना पास देण्याची कार्यवाही सुरू करावी, असा आदेश दिला. त्याबाबतचे लेखी आश्‍वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर विद्यार्थी व प्रवाशांनी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देत फटाक्‍यांची आतषबाजी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com