agriculture news in Marathi ST will reach to farm Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा हजार बसचा पसारा सांभाळणारी लालपरी कोरोनाच्या संकटामुळे खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यात मागे पडली आहे. 

सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा हजार बसचा पसारा सांभाळणारी लालपरी कोरोनाच्या संकटामुळे खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यात मागे पडली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली किसान रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाने ‘मालपरी' सुरु केली आहे. कडधान्यासह सर्वच शेतमाल वाहतुकीसाठी लालपरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाठविली जाणार आहे. सद्यः स्थितीत ८०० प्रवासी गाड्यांचे रूपांतर माल वाहतूक गाड्यांमध्ये झाले आहे. आणखी एक हजार गाड्यांचे रूपांतर मालवाहू गाड्यांमध्ये करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

गावोगावी वाढलेली वैयक्‍तिक खासगी वाहने आणि तालुक्‍याच्या ठिकाणी वाढलेल्या खासगी प्रवासी वाहतुकीमुळे लालपरी अडचणीत सापडली. त्यामुळे अडचणीतील परिवहन महामंडळाला सावरण्यासाठी सरकारने दोन हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी परिवहन मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, कोरोना काळात राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने महामंडळाची मागणी पूर्ण झाली नाही. दुसरीकडे प्रवासी वाहतूक सुरु झाल्यानंतर अपेक्षित असलेला प्रवाशांचा प्रतिसादही मिळाला नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक होऊ लागल्याने महामंडळाने मालवाहतूक योजना सुरु केली. 

आरटीओच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांचे मालवाहतुकीत रूपांतर केले जात आहे. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नांदेड, बीड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा शेतमाल मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्ये पोच करण्याची सोय झाली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल आता शेतातून उचलला जाणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य सेवा 
कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा वाहतूक पूर्णपणे बंदच होती. या काळात महामंडळाला दररोज २२ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा फटका सोसावा लागला. आता वाहतूक सुरु होऊनही कोरोनाच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक, अशी स्थिती महामंडळाची झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शेतकऱ्यांसह उद्योजकांचा माल महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात पोचविण्याची सोय महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. या नव्या उपक्रमाचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात आंतरराज्य सेवा सुरु केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री परब यांनी दिली. 

एसटी महामंडळाची स्थिती 
१७,१०० 

एकूण एसटी 
६,५०० 
सध्या मार्गावरील प्रवासी बस 
८०० 
माल वाहतूक बस 
३.७० कोटी 
महामंडळाचे दररोजचे उत्पन्न 
१,००० 
वाढीव मालवाहतूक बस 
 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...