धान खरेदीसाठी ‘स्टार बाजार’चा पूर्व विदर्भात करार

साखरेचे प्रमाण कमी असलेले भाताचे आर.एन.आर.१५०४८ वाण
साखरेचे प्रमाण कमी असलेले भाताचे आर.एन.आर.१५०४८ वाण

भंडारा :  साखरेचे प्रमाण कमी असलेल्या आर.एन.आर.१५०४८ वाणाच्या तांदळाची टाटा कंपनीच्या ‘स्टार बाजार’मार्फत खरेदी केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील चौरास शेतकरी उत्पादक कंपनीसोबत पहिल्या टप्प्यात ५०० एकरांवरील धान उत्पादनाचा करार करण्यात आला आहे. याव्दारे सुमारे ६५० मेट्रीक टन तांदळाचे उत्पादन होईल.  पूर्व विदर्भातील दुर्गम भागात असलेल्या शेतकरी उत्पादकता कंपन्यांनी दर्जेदार आणि बाजारपेठेत मागणी असलेल्या शेतमालाच्या उत्पादनावर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यामध्ये चौरास शेतकरी उत्पादक कंपनीचाही समावेश आहे. तेलंगणा विद्यापीठाव्दारे विकसित आर.एन.आर.१५०४८ वायएसआर तसेच अन्य संशोधक संस्थेच्या पांडुरंग या तांदूळ वाणांमध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या तांदूळ वाणांना देशपातळीवर मोठी मागणी आहे.  टाटा ग्रुपअंतर्गत असलेल्या स्टार बाजारच्या माध्यमातून हे तांदूळ वाण देशभरातील त्यांच्या आऊटलेमधून विकले जातात. त्याच्या पुरवठ्यासाठीचा सामंजस्य करार चौरास शेतकरी उत्पादक कंपनीशी करण्यात आला आहे. कंपनीने ५०० एकरांवर उन्हाळी धानाची लागवड केली असून २३ क्‍विंटल एकरी उत्पादन अपेक्षित आहे. त्याव्दारे ११५० मेट्रीक टन धानाची उत्पादकता तर प्रक्रियेअंती ६५० मेट्रीक टन तांदूळ मिळेल. 

पावसाळ्यात दीड हजार एकरावर कमी साखर टक्‍केवारी असलेल्या तांदूळ उत्पादनासाठी रॅलीज, टीसीएस यांच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन शेतकरी कंपनीला केले जाईल. प्रत सुधारण्यासाठी धान आठ महिने जुना असणे गरजेचे राहते. त्यामुळे त्याला साठवावे लागते. त्यानंतरच तो चविष्ट राहतो अन्यथा अशा तांदळात चिकटपणा राहतो, असे अनिल नौकरकर यांनी सांगितले.  शेतकरी कंपनी उभारणार राईस मिल यापुढील काळात चौरास शेतकरी कंपनीच्या माध्यमातून सहा हजार एकरांवर धान उत्पादन घेतले जाणार आहे. त्यातून १५ हजार मेट्रीक टन धान, ९ हजार मेट्रीक टन तांदूळ मिळेल. साडेतीन वर्षांनंतर इतके मोठे क्षेत्र अपेक्षित आहे. या धानावर प्रक्रियेकामी इतरांकडे जाण्याची गरज भासू नये याकरिता सहा कोटी रुपयांतून २ हजार मेट्रीक टनाचे गोदाम आणि धान मिल उभारण्याचे प्रस्तावित आहे. दोन एकरांवर या प्रकल्पाची उभारणी केली जाईल, असेही अनिल नौकरकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com