भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यावर भाजपने प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत खडसे हे २५ तर तावडे २७ व्या क्रमांकावर आहेत. हे दोघेही महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.

निवडणूक प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. भाजपच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची नावे दिली आहेत.

भाजपचे राज्यातील स्टार प्रचारक ः चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशिष शेलार, रणजित पाटील, विजयराव पुराणिक, पूनम महाजन-राव, विजया रहाटकर, माधवी नाईक, सुजितसिंग ठाकूर, पाशा पटेल, भाई गिरकर, प्रसाद लाड.

काँग्रेसचे स्टार प्रचारक ः मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदिया, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, कमलनाथ, भूपेश बघेल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, राजीव सातव, रजनी पाटील, सचिन पायलट, शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री नगमा, विजय वडेट्टीवार, मधुकर भावे, नाना पटोले, आर. सी. खुंटिया, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, हुसेन दलवाई, नसीम खान, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमर राजूरकर, सुश्मिता देवी, कुमार केतकर, चारूलता टोकस, उदित राज, नदीम जावेद.  

‘राष्ट्रवादी’चे ४० स्टार प्रचारक राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी शनिवारी (ता.५) जाहीर केली. यामध्ये ‘राष्ट्रवादी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शेतकरी नेते अण्णा डांगे, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार माजिद मेमन, अमोल मेटकरी, वर्षा पटेल, प्रकाश गजभिये, किरण पावसकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे, रामराव वडकुते, फौजिया खान, शब्बीर विद्रोही, जयदेव गायकवाड, नरेंद्र वर्मा, रूपाली चाकणकर, मेहबूब शेख, ईश्वर बाळबुधे, नसीम सिद्दीकी, शेख सुबान अली, अविनाश धायगुडे, प्रदीप सोळंके, सुषमा अंधारे, सक्षणा सलगर आदींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com