सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा 

Starara district in dam storage full
Starara district in dam storage full

सातारा ः जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने सर्व प्रमुख धरणांतील पाणीपातळी टिकून आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रमुख धरणांत अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोयना धरणात एकूण ६८.३७ टीएमसी अधिक उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने वीजनिर्मितीबरोबर सिंचनास फायदेशीर ठरणार आहे.

जिल्ह्यात पावसाळ्यात अतिपाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी धरणातील पाणीसाठ्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरत आहेत. प्रमुख सहा धरणातून शंभर टीएमसीवर पाणी सोडून द्यावे लागले होते. तरीही सध्या धरणात गतवर्षीच्या तुलेनत मुबलक पाणीसाठा उपलब्ध सर्वच धरणांत ६० टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. वीजनिर्मितीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठी उपलब्ध  आहे. 

गतवर्षी कोयना धरणात ६५.०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. तर सध्या ६८.३७ टीएमसी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.३४ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात ६८.२८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने वीजनिर्मितीस फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यात क्षमतेने दोन नंबर असलेल्या धोम धरण व उरमोडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा फायदा एप्रिल आणि मे या महिन्यात भासण्याऱ्या टंचाईवर मात करता येणार आहे. 

उरमोडी धरण हे माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांच्या दुष्टीने महत्त्वाचे असून या धरणात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजेच ८.३८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे भर उन्हाळ्यातील भासण्याऱ्या पाणी टंचाईवर मात करता येणे शक्य होणार आहे. गुरुवारअखेर कोयना धरणात ६८.२८ टक्के, धोम ६८.७६, कण्हेर धरणात ५९.९९, उरमोडी धरणात ८६.८६ तर तारळी धरणात ६४.८६ तर धोम-बलकवडी धरणात ७१.०० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com