Agriculture news in marathi Start ‘Rasaka’ early, farmers demand | Agrowon

'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

 निफाड : तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना लवकर सुरू व्हावा, अशी मागणी निफाड तालुक्यातील काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना सुरू होण्याबाबत काम चालू आहे. मात्र अद्याप त्यादृष्टीने गती आली नाही. कारखाना सुरू होणे ऊस उत्पादकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारखाना लवकर सुरू व्हावा, अशी मागणी निफाड तालुक्यातील काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. 

निवेदनानुसार, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने ऊस लागवड वाढली आहे. मात्र जिल्ह्यातील एकच साखर कारखाना सुरु आहे. त्यामुळे ऊस विक्रीसाठी अडचणी येत आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादकांचा ऊस पंधरा महिन्यांचा होऊन देखील तुटला नाही. त्यात नवीन उसाचे क्षेत्र मोठे आहे.  

जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सचिन होळकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. किसान काँग्रेसचे स. का. पाटील, शिवसेनेनेचे नेते सुरेश डोखळे, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, पंडित महाराज कोल्हे आदी उपस्थित होते.

होळकर म्हणाले, ‘‘भविष्यात कारखाना सुरू झाला नाही, तर उसाची विक्री अवघड होईल. सर्व बाबींचा विचार करता रानवड सहकारी साखर कारखाना अत्यंत लवकर सुरू होणे गरजेचे आहे.’’ 


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...