Agriculture news in marathi To start ‘Rasaka’ Fulfillment of promises | Agrowon

'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची पूर्ती

मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना बंद पडला. त्यामुळे ऊस उत्पादकांची कोंडी झाली. हा बंद कारखाना सुरू करणे हा तालुक्यातील राजकीय अजेंड्यावरचा भाग होता.

नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना बंद पडला. त्यामुळे ऊस उत्पादकांची कोंडी झाली. हा बंद कारखाना सुरू करणे हा तालुक्यातील राजकीय अजेंड्यावरचा भाग होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार दिलीपराव बनकर यांनी तो सुरू करण्याचा शब्द दिला. आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला.  त्यांनी आश्वासनपूर्ती केली आहे. 

रानवड (ता. निफाड) येथील ‘रासाका’च्या ३९ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ रविवारी (ता.२४) झाला. गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याची विधिवत पूजा आरती फडे, अप्पासाहेब गावले, अण्णासाहेब मुरकुटे, अनिल वाघ, विजय सरोदे, अविनाश बनकर आदी शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक झाली. 

बनकर म्हणाले, ‘‘जनतेने टाकलेला विश्वास मी व संचालक मंडळाने सार्थ ठरविला. येत्या काळात रानवड सहकारी साखर कारखाना व परिसराला गतवैभव प्राप्त करून देईल.’’ 

या वेळी पंढरीनाथ थोरे, दत्तात्रेय डुकरे,भाऊसाहेब भवर,नामदेव शिंदे विलास बोरस्ते,सुरेश खोडे,विश्वास मोरे यांनी मनोगते व्यक्त केली. 

‘चांगला दरासाठी प्रयत्नशील’ 

रासाका सुरु करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्नशील होतो.परंतु काही लोकांच्या राजकीय स्वार्थापाई अनेक निविदा प्रक्रियेत भाग घेऊनही केवळ राजकीय दृष्टिकोनातून कारखाना मिळवून दिला जात नव्हता.आता काही दिवसातच चालू हंगाम सुरु होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याप्रमाणे ऊस रानवड साखर कारखान्यास द्यावा. इतर कारखान्याप्रमाणे निश्चितच चांगला भाव देण्यासाठी प्रयत्नशील राहू,असे आमदार बनकर यांनी नमूद केले.
 

टॅग्स

इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...